फोनवर बोलण्यासाठी बाईक थांबवली अन् घात झाला; क्षणात होत्याचे नव्हते झाले! सांगा चूकी कुणाची?

आपण दुचाकी वरील अपघात पाहिले असतील पण अनेक वेळा चुकी नसताना जर अपघात झाला तर..अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. गेवराई येथील किनगाव येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

एक दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा मृत्यू झाला असून पती आणि मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. यावेळी एका अज्ञात वाहनाने दुचाकीला अचानक धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पती पांडुरंग चाळक आणि मुलगा आरूष चाळक या दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.

३० वर्षीय स्वाती पांडुरंग चाळक आणि ३५ वर्षीय पांडुरंग चाळक आपल्या ४ वर्षीय अरूष चाळक याच्यासोबत अंबड तालुक्यातील चर्मापुरी येथील नातेवाईकांकडे गेले होते. यानंतर शनिवारी ते ताडहदगाव येथे शनिवारी कार्यक्रमासाठी गेले होते.

दुपारी १ च्या सुमारास चाळक कुटुंब ताडहदगाववरून चर्मापुरीकडे जात होते. शहापूरजवळ आले असता फोनवर बोलण्यासाठी पांडुरंग यांनी त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली.

फोनवर बोलत असताना अचानक अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिली त्यामुळे मागे बसलेल्या स्वाती चाळक यांचा जागीच मृत्यू झाला. पांडुरंग आणि अरुष दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

डॉक्टरांनी स्वाती यांना तपासून मृत घोषित केले आहे. तसेच जखमी झालेल्या पतीला आणि मुलाला पुढील उपचरासाठी बीडमध्ये. पाठवण्यात आले आहे. धडक दिलेल्या सदर वाहनाबद्दल अद्यापही अजून काही समजले नसले तरी पोलिसांचा तपास चालू आहे.

 

महत्वाच्या बातम्या
७ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा मोदींचा गुण मला सर्वांत जास्त आवडतो: प्रीतम मुंडे
खाणीत काम करताना मजुराला भेटला तब्बल ४० लाखांचा हिरा, एका रात्रीत झाला लखपती
राम-लखन चित्रपटातील या अभिनेत्रीने पार्टीमध्ये कापून घेतली होती हाताची नस, किस्सा वाचून धक्का बसेल
देशात अडीच कोटी लोकांच्या लसीकरणानंतर काॅंग्रेसचा ताप वाढला; मोदींचा हल्लाबोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.