वर्षभरापुर्वी मृत्यु झालेल्या तरुणाचा मृतदेह गावकऱ्यांनी अजूनही ठेवलाय सांभाळून; कारण वाचून बसेल धक्का

छत्तीसगड राज्यात सैनिकांवर नक्षलवाद्यांचा हल्ला होणे, नवीन नाही. त्यामुळे सैनिकही या नक्षलवादी भागांवर कारवाई करत असतात. या कारवाईत अनेकदा निष्पाप लोकांचा जीवही जातो.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल जाणून घेणार आहोत, जी घटना डिसेंबर २०२० मध्ये घडली होती. त्यावेळी बिजापूरच्या गामपुर येथील रहिवासी असणाऱ्या बदरु नावाच्या २२ वर्षीय तरुण जंगलात फुले वेचण्यासाठी घेतला होता.

त्यावेळी एका खाकी वर्दीतील जवानाने या तरुणावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यु झाला होता. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी त्यांनी पाहिले काही खाकी वर्दीतील जवान त्या तरुणाचा पाय पकडून ओढत नेत होते.

त्यावेळी गावकऱ्यांनी त्या तरुणाचा मृतदेह मागितला पण जवानांनी तो दिला नाही. पोलिसांनी त्या मृतहेदाचे शवविच्छेदन केले. पण मृतदेह कुटुंबाच्या दाब्यात दिला नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन केले तेव्हा त्यांना मृतदेह देण्यात आले.

बदरु हा तरुण हा नक्षली टोळीशी संबंधित असून तो जन मलेशियाचा कमांडर असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. तसेच बरुदकडे बॉम्ब आणि अत्याधुनिक हत्यार मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले होते. पण तो निष्पाप असून जंगलात महुआची फुले वेचण्यासाठी गेला होता. पण पोलिसांनी त्याच्यावर हल्ला करुन त्याला मारले, असे गावकऱ्यांनी म्हटले होते.

त्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्या मृतदेहावर अजूनही अंत्यसंस्कार केलेल नाही. त्यांनी बरुदच्या अंगाला एक औषध लावले असून त्या मृतदेहाला जमिनीच्या खाली ठेवले आहे. जोपर्यंत बरुदला न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्याचा अंत्यसंस्कार करणार नाही, असे गावकऱ्यांनी म्हटले आहे.

सध्या त्या मृतदेहाची अवस्था खुप वाईट झाली असून फक्त हाडे उरली आहे. असे असतानाही गावातील लोक बदरु आणि त्याच्या कुटुंबाच्या न्यालासाठी लढत आहे. तसेच या प्रकरणी बीजापुर उच्च न्यायालयात जाणार असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.