VIDEO: पोलिसांसमोर तरुणीचा भररस्त्यात ड्रामा; मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनाही सुनावले खडे बोल

सध्या कोरोनाच्या संकटात काही लोक पोलिसांशी गैरवर्तुवणूक करताना दिसून येत आहे. अनेक लोकांचे असे व्हिडिओ व्हायरल होत आहे. आता पुन्हा एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बिहारची पाटणामध्ये बोरींड रोडच्या चौकात एका स्कुटीवाल्या तरुणीमध्ये आणि पोलिसांमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा दिसून आला आहे. ही घटना बुधवारी घडली असून या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तरुणीने हेल्मेट न घातल्यामुळे तिला पोलिसांनी अडवले होते. तसेच तिला दंड भरण्यास पोलिसांना सांगितले. त्यावेळी तिने पोलिसांसमोर चांगलाच ड्रामा सुरु केला आहे. तरुणीने पोलिस, रुग्णालय, कोरोना, लॉकडाऊन या सर्व मुद्यावरुन आरडाओरड सुरु केला आहे.

तसेच तरुणीने बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टिका केली आहे. मी मास्क घातलाय ना, मग हेल्मेट सक्ती का करताय? असा सवालही तरुणीने पोलिसांसमोर उपस्थित केले आहे.

पोलिसांशी वाद घालणाऱ्या तरुणीने पास काढण्यासाठी बाहेर पडल्याचा दावा केला आहे. रिक्षावाले, सामान्य लोक मरत आहे. केंद्र आणि राज्य सरकार मनात येईल, तेव्हा लॉकडाऊन करत आहे. मोदीजी आणि नितिशी कुमार रिक्षावाल्यांसाठी काही करत नाही. मी त्यांच्यासाठी काम करतेय, असे तरुणीने म्हटले आहे.

तसेच पोलिसांनी दंड मागितला असता, तिने पुन्हा पोलिसांशी भांडण्यास सुरुवात केली. जर माझ्याकडून चलान घेतले, तर पुर्ण बिहारमध्ये गोंधळ घालेल, असेही तरुणीने पोलिसांना म्हटले आहे.

पाटणा शहरात बोरींग रोड चौकात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी ही तरुणी हेल्मेट न घालता स्कुटीवरुन जाताना पोलिसांना दिसली होती, त्यानंतर जेव्हा महिलेला आडवले तर तिने हा सर्व ड्रामा केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

भावाचा नाद नाय! हाय हिल्स घालून असा धावला की थेट वर्ल्ड रेकॉर्डच केला; पहा व्हिडिओ
VIDEO: धक्कादायक! केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला; काचा फोडल्या अन्…
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक असेल; शास्त्रज्ञांनी वर्तवली शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.