लग्नात जेवणामध्ये माशाचं डोकं खायला न वाढल्यामुळे तुफान हाणामारी; ११ जण गंभीर जखमी

लग्नात वादविवाद होणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. पण अनेकादा वावविवाद इतके वाढता कि लग्नही तुटते, तर अनेकदा काही वादविवादांमुळे गंभीरण हाणामारी झालेली पण बघायला मिळते.

आता अशीच एक धक्कादायक घटना बिहारच्या गोपालगंज जिल्हात घडली आहे. या ठिकाणी एक लग्नामध्ये माशाचे डोके खायला दिले नाही, म्हणून दोन गटांमध्ये जबर मारहाण झाली आहे. या मारहाणीत ११ जण गंभीर जखमी झाले आहे.

ही घटना गोपालगंज जिल्ह्याच्या भोरे स्टेशनजवळ घडली आहे. फक्त माशाचे डोके जेवणात वाढल्यामुळे या लग्नामध्ये मारामारी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जे ११ जण गंभीर झाले आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच पोलिसांनी पण जखमी झालेल्या लोकांची चौकशी केली आहे.

गुरुवारी रात्री छठू गोंड नावाच्या माणसाच्या घरात वरात आली होती. लग्न समारंभात मासे आणि भात अशा प्रकारचे जेवण ठेवण्यात आले होते. त्यावेळी राजू गोंड नावाचा एक तरुण मासे वाढत होता. त्यानंतर शेजारी राहणारे अजय गोंडने पण त्याच्या ओळखीच्या माणसांना जेवायला बोलावले.

खाण्याच्या पहिल्या पंगतीमध्ये त्या लोकांनी पोटभर जेवले आणि शेवटी माशाचे डोके खाण्यासाठी मागितले. पण माशाचे डोके नसल्याने त्यांनी नकार दिला. पण त्या लोकांनी राजूला आणि त्याच्यासोबत वाढत असलेल्या मुन्नाला मारण्यास सुरुवात केली.

त्यानंतर ते भांडण वाढत गेले आणि एकमेकांना खुर्च्यांनी मारण्यास सुरुवात केली. या हाणामारीत ११ जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे शेजारी राहत असलेल्या लोकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले. या घटनेमुळे पुर्ण लग्नातच खळबळ माजली.

शुक्रवारी उपचारानंतर छठू गोंड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता पोलिस या प्रकरणाता तपास करत आहे. पोलिस दोन्ही गटांची चौकशी करत आहे, असे हथुआ एसडीपीओ नरेश कुमार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

८ कोटीचे सामान चोरी होऊनही नाही करू शकला तक्रार, काय होते कारण, जाणून घ्या…
धक्कादायक! टॉपलेस फोटोमुळे ट्रोल झालेल्या पॉर्न स्टारचा संशयास्पद मृत्यू
माझ्या बायकोचे माझ्या भावोजीसोबत अफेअर होते; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचे खळबळजनक आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.