बिहारमध्ये नाट्यमय वळण! सुरवातीच्या पिछाडीनंतर एनडीएला बहुमताची आघाडी; तेजस्वीला झटका

बिहार निवडणूकीची मतमोजणी सुरू झाली अजून सुरुवातीच्या निकालातून नितीशकुमार आणि भाजपला मोठा धक्का बसल्याचे दिसत होते. मात्र आता एनडीए आघाडीवर गेल्याचे दिसत आहे. महागठबंधन ११० जागांवर तर एनडीए ११५ जागांवर आघाडीवर आहे.

या निकालावरून सध्या जोरदार लढत बघायला मिळत आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर तेजस्वी यादव हे आघाडी घेत पुढे होते, मात्र आता भाजप आणि नितीशकुमार यांनी आघाडी घेतली आहे.

केवळ ५ ते १० जागांच्या फरकाने हा निकाल मागे- पुढे होत आहे. यामुळे पुढील काही तासातच निकाल स्पष्ट होणार आहे. तेजस्वी यादव सुरुवातीला आघाडीवर होते. आता ते पिछाडीवर गेल्याचे दिसत आहे.

यामुळे आता नितीशकुमार मुख्यमंत्री होणार की सरकार पडणार हे लवकरच समजणार आहे. मोदी लाट कायम आहे की नाही हे देखील या निकालावरून दिसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याठिकाणी सभा घेतल्या होत्या. यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

तेजस्वी यांच्या सभांना तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला होता. यावेळी ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दुपारपर्यंत या निवडणुकीचा निकाल पूर्णपणे जाहीर होणार आहे. सर्व पक्षाचे नेते विजयाचा दावा करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.