वीज पडायच्या ४० मिनिटे आधीच मिळणार अलर्ट; बिहार सरकारने लॉंच केले खास ॲप

 

नवी दिल्ली | मागील महिन्यापासून बिहार मध्ये वीज पडून शंभरपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तेव्हापासून बिहार सरकार लोकांना हवामानाचा अंदाज आणि विजेपासून बचाव करण्याच्या पद्धतींची माहिती देत आहे.

वीजे पासून लोकांचे रक्षण व्हावे म्हणून बिहार सरकारने इंद्रवज्र(indravajra) नावाने एक ॲप लॉन्च केले आहे. हे ॲप लोकांना वीज पडण्याआधी ४० ते ४५ मिनिटे आधी अलर्ट करते.

या ॲपची खास गोष्ट म्हणजे अलर्ट म्हणून तुमच्या स्मार्ट फोनची रिंगटोन वाजणार आहे. बिहार सरकारने राज्यातील लोकांना जास्तीत जास्त संख्येत हे ॲप डाऊनलोड करण्याची अपील केली आहे.

तुम्ही ज्या लोकेशनवर आहात त्याच्या २० किलोमीटर पर्यंतच्या भागात जर वीज कोसळणार असेल तर ४० ते ४५ मिनिटे आधीच तुम्हाला अलर्ट मिळेल. आतापर्यंत एक लाख पेक्षा अधिक लोकांनी या ॲपला डाउनलोड केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.