बिहारचा ‘बाहुबली’ पुन्हा नितीशराज! भाजपा प्रणित एनडीएला मिळालं स्पष्ट बहुमत

मुंबई | बिहार निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDAने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागा मिळवल्या आहेत.

तसेच या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. तर सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर असलेल्या महागठबंधनला ११० जागा मिळाल्या. तसेच तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाआघाडीतल्या काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे.

तर भाजपला ७४ जागा मिळाल्या असून तो दुसऱ्या क्रमांकवर आहे. भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा २१ जागांचा फायदा झाला आहे. २०१५ च्या निवडणुकीत भाजपला ५३ जागा मिळाल्या होता. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला मोठा फटका बसला आहे.

‘जनतेने नरेंद्र मोदी आणि एनडीएला दिलेलं समर्थन अद्भूत आहे. या निकालामुळे मोदी सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या यशस्वी लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि युवकांचा विश्वास दिसून आलाच, त्याचबरोबर देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला,’ अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

दरम्यान, NDAने स्पष्ट बहुमत मिळवल्याने सातव्यांदा नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. २००५ मध्ये बहुमत घेऊन नितीश पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले मात्र २००० च्या सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, काही दिवसांत त्यांचे सरकार बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे पडले. त्यानंतर तीन निवडणुकात नितीश कुमार यांनी सहावेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

महत्त्वाच्या बातम्या
देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला – शरद पवार
बिहारचा ‘बाहुबली’ कोण? ‘आरजेडी’ने घेतली मुसंडी, एनडीए आणि महाआघाडीत ‘कांटे की टक्कर’
कॉग्रेसला उपदेशाचे डोस पाजणाऱ्या संजय राऊतांना कॉंग्रेस नेत्यानेच फटकारले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.