तेजस्वी यादवांची गाडी निघाली सुसाट; भाजप जेडीयूला मोठा झटका

मुंबई | करोनाच्या संकटात होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. बिहार विधानसभेची सदस्यसंख्या २४३ असून, बहुमतासाठी १२२ जागां आवश्यक आहे.

कलांनुसार महागठबंधनने बहुमताचा आकडा गाठला आहे. १६१ जागांचा निकाल हाती आला असून यातील महागठबंधनने मुसंडी घेत ८५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे एनडीए ६६ जागांवर आहे. दरम्यान, पोस्टल बॅलेटच्या मोजणीमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने मोठी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, पहिल्या काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीनं आघाडी घेतली आहे. सुरूवातीच्या कल हाती येताच राजदच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह ३७३३ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मागील १५ वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल.

 

महत्त्वाच्या बातम्या
या लढाईत मराठी माणसांनी आमच्या मागे उभं राहावं; अक्षता नाईक यांचं भावनिक आवाहन
तेजस्वी यादव आज जर जिंकले तर संपूर्ण देशात इतिहास रचतील; तो कसा? वाचा…..
..म्हणून आजपर्यंत महेश भट्ट आणि सलमान खानच्या कुटुंबाने एकत्र कधीही एकत्र काम केले नाही

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.