Homeक्राईमवडिलांच्या संमतीशिवाय प्रेम विवाह करणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसायाला लावले जाते; डीजीपीनी स्पष्टच...

वडिलांच्या संमतीशिवाय प्रेम विवाह करणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसायाला लावले जाते; डीजीपीनी स्पष्टच सांगितले

बिहारचे पोलीस महासंचालक यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली. डीजीपी एसके सिंघल यांनी केलेल्या विधानामुळे आता ते चांगलेच अडचणीत येऊ शकतात. डीजीपी म्हणाले की, आज मुली लग्नासाठी आई, वडिलांच्या संमतीशिवाय घर सोडत आहेत, ज्याचे दुःखद परिणाम आहेत. यातील अनेक मुलींची हत्या केली जाते, तर अनेकांना वेश्याव्यवसायाला सामोरे जावे लागते. ज्याची किंमत पालकांना मोजावी लागते.

डीजीपींनी पालकांना आपल्या मुला-मुलींशी बोलत राहण्याचा सल्ला दिला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार समाज सुधार अभियान राबवत आहेत. हे अभियान सध्या समस्तीपुर येथे सुरु आहे. त्याच व्यासपीठावरून लोकांना संबोधित करताना एसके सिंघल यांनी हे वक्तव्य केलं आहे. सिंघल यांच्या वक्तव्यानंतर आता ते अडचणीत देखील येऊ शकतात.

कुटुंबाच्या संमतीशिवाय मुलींचं लग्न होत असल्याबद्दल पोलीस महासंचालक एस.के.सिंघल यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुढे ते म्हणाले की, आमच्या अनेक मुली त्यांच्या आई आणि वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन स्वतःहून लग्न करतात. याचे अनेक दुःखद परिणाम आहेत. एकूणच प्रेमविवाहाबाबत सिंघल यांनी दिलेला सल्ला पुढे बसलेल्या श्रोत्यांना कितपत पटला असेल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे.

अनेक मुलींची हत्या केली जाते आणि अनेक मुली वेश्याव्यवसायात पोहोचतात. चिंता व्यक्त करताना DGP म्हणाले की, त्या मुली आयुष्यात काय करू शकतील याचा काही नेम नाही. त्यांचं काहीही योग्य होत नाही आणि कुटुंबाला त्यांचे खूप दुःख सहन करावे लागते असे म्हणत त्यांनी पालकांनाही सल्ला देण्याचा प्रयत्न केला.

पालकांना दिला ‘हा’ सल्ला
आई, वडिलांनी आपल्या मुला-मुलींशी समान संवाद साधला पाहिजे.
मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवावेत.
पालक मुलांच्या भावना समजून घेतात आणि त्यांच्याशी जोडलेले राहतात.
जेणेकरून तुम्ही चांगल्या समाजाच्या जडणघडणीत हातभार लावू शकाल.

बिहारच्या निवडणूक काही महिन्यांवर आलेल्या असताना राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे आजकाल सामाजिक सुधारणा अभियानांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोहोचत आहेत. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी समस्तीपूरमध्ये मुक्काम केला. त्या अनुषंगाने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

ताज्या बातम्या
पेट्रोल पंपावर जाताना घ्या ‘या’ ५ गोष्टींची काळजी, कधीच होणार नाही फसवणूक
मंदिराच्या दानपेटीत कंडोम टाकायचा अन् पळून जायचा; पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर म्हणाला…
दोन मुलांचा बाप असणाऱ्या या सुपरस्टारच्या प्रेमात पडली रश्मिका? नाव वाचून हादराल
…अन् बॉयफ्रेंड अर्जून कपूरच्या नादात मलायका आपल्या मुलालाच विसरली; पहा हैराण करणारा व्हिडिओ   

ताज्या बातम्या