Bihar bandh: बिहारमधील दरभंगा (Darbhanga Bihar) शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi PM) यांच्या आईबद्दल वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह शब्दांच्या निषेधार्थ गुरुवारी, ४ सप्टेंबर रोजी पाच तासांसाठी बिहार बंद (Bihar Bandh) ठेवण्यात आला. हा बंद भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने (BJP Mahila Morcha) पुकारला होता.
भाजप महिला मोर्चाच्या नेत्यांनी मुझफ्फरपूर (Muzaffarpur Bihar) मध्ये एका साडीच्या दुकानात प्रवेश करून लुटमार केली आणि “मैं भी मां हूं (Mee Bhi Maa Hoon)” अशी घोषणा देत दुकानात ताबा घेतल्याचा प्रकार समोर आला.
राजद (RJD party) सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav leader) यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत इन्स्टाग्रामवर लिहिले की, “पंतप्रधान मोदींनी संपूर्ण बिहारमधील महिलांना आणि मुलींना शिवीगाळ करण्याचे आदेश दिले आहेत का? भाजपचे सदस्य आदरणीय शिक्षक, विद्यार्थिनी, गर्भवती महिला, वृद्ध लोक आणि पत्रकारांवर हल्ला करीत आहेत. हे बरोबर आहे का? लज्जास्पद आहे!”
तेजस्वी यादव (Tejashwi Yadav RJD leader) यांनी सांगितले की, “भाजप आणि एनडीएने आयोजित केलेला बिहार बंद पूर्णतः अपयशी ठरला. सामान्य नागरिकांचा कोणताही पाठिंबा मिळाला नाही. उलट भाजपच्या लोकांनी रस्त्यावर गुंडगिरी केली. महिलांशी, शिक्षकांशी गैरवर्तन, रुग्णवाहिका थांबवणे, नागरिकांना त्रास देणे ही सगळीकथा बिहार बंदमध्ये दिसून आली. त्यामुळे या बंदला बिहारमधील नागरिकांचा कोणताही पाठिंबा मिळालेला नाही.” या प्रकरणाने बिहारमध्ये राजकीय वाद अजूनच वाढवला असून, नागरिकांमध्ये चिंता आणि संताप निर्माण झाला आहे.






