राहुल गांधी पुन्हा ठरले अपयशी! सभा झालेल्या ५२ पैकी ४२ जागांवर महागठबंधन पिछाडीवर

मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. तासाभरात महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, हे कल हळूहळू बदल गेले. दुपारी तीनपर्यंत एनडीएने महाआघाडीला पिछाडीवर टाकत आघाडी घेतली.

भाजपने जदयूबरोबर पुन्हा एकदा मुसंडी मारत NDA ला १२३ जागांवर आघाडी मिळवून दिली आहे. यापैकी २७ जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने ११२ जागांवर दावा कायम ठेवला आहे. आतापर्यंत त्यांना १५ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे महागठबंधन पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

याचबरोबर या निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी ताकद पणाला लावली होती. यादव यांनी तब्बल २५० सभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे यादव यांच्या तुलनेत काँग्रेसने फार जोर लावला नाही. त्यामुळेच महागठबंधनला अपेक्षित जागा मिळाला नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहे.

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे दिसतं आहे. राहुल यांनी बिहारमध्ये ८ सभा घेतल्या. मात्र त्याचा परिणाम विधानसभेच्या ५२ जागांवर झाला नसल्याचे दिसतं आहे. यातल्या ४२ जागांवर महागठबंधनचे उमेदवार पिछाडीवर आहेत. तर केवळ १० जागांवर महागठबंधनला आघाडी मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मोदींनी घेतलेल्या १२ सभा ठरताहेत टर्निंग पाॅईंट? पहा त्या जागांवर काय आहे निकाल
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ ठरला! मुख्यमंत्री कोण होणार? भाजप नेता म्हणतोय..
बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ! मुख्यमंत्री पदाबाबत नेत्यांकडून मोठी वक्तव्ये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.