कोरोनासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत! विप्रोच्या अझीम प्रेमजींकडून दररोज 22 कोटी

नवी दिल्ली । गेल्या वर्षभरापासून आपला देश कोरोनाशी दोन हात करत आहे. आता दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला असून रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे अनेक दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत. यामध्ये विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजींकडून कोरोना मदतीसाठी दररोज २२ कोटींची मदत जाहीर केली आहे.

विप्रोच्या अनेक संस्थांमार्फत ही मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामध्ये अझीम प्रेमजी फाऊंडेशनने एक हजार कोटी रुपये दिले. तसेच विप्रोने कोविड साथीमध्ये सर्व देशभर साथीच्या आजाराशी लढण्यासाठी १०० कोटी रुपये आणि विप्रो इंटरप्राईजेसने २५ कोटी रुपये दिले.

यामुळे आता मोठी मदत होणार आहे. देशभरात लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. यातच सरकारची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. यामुळे अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत.

सध्या रतन टाटा, मुकेश अंबानी, असे मोठे उद्योजक देखील मदतीसाठी पूढे येत आहेत. दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर देखील मिळत नाहीत. यामुळे टाटांनी परदेशातून ऑक्सिजन उपलब्ध केला आहे.

तसेच रिलायन्सकडून देखील मोफत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे अझीम प्रेमजींनी केलेली मदत देखील अनेकांसाठी उपयोगी पडणार आहे.

कोरोना काळातील ही सर्वांत मोठी मदत आहे. अनेक सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान सहायता निधी तसेच मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था देखील मदतीसाठी पुढे येत आहेत.

ताज्या बातम्या

रुग्णालयातच परीक्षेची तयारी करतोय कोरोना रूग्ण, त्याच्या जिद्दीचे कलेक्टरनेही केले कौतूक; म्हणाले..

या गावाची राज्यात चर्चा! गावात ‘घर तिथे ऑक्सिजन बेड’चा ग्रामपंचायतीचा निर्णय

…तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली की, “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.