Bigg Boss च्या जुन्या स्पर्धकाला शो मध्ये ‘न्यूड योगा’ची ऑफर; मात्र स्पर्धकानं केली ‘इतक्या’ लाखांची मागणी

मुंबई। टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ हा कायम प्रेक्षकांच्या पसंतीचा शो ठरला आहे. ‘बिग बॉस’ हा शो प्रत्येकवेळी प्रेक्षकांसाठी मसालेदार आणि धमाकेदार असं काहीतरी वेगवेगळे टास्क असो किंवा कंटेन्ट घेऊन येत असतो. अशातच ‘बिग बॉस’ 15 एका हटके अंदाजात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता नुकताच बिग बॉस सीझन-15 चा ईदच्या दिवशी पहिला प्रोमो जाहीर करण्यात आला आहे. मात्र यावेळी बिग बॉसमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे समोर येत आहे. आता हा शो फक्त सहा आठवड्यांसाठी असणार आहे. दरम्यान या वेळी हा शो OTT प्लॅटफॉर्मवर देखील दिसणार आहे. वूट वर हा शो पाहता येणार आहे. डिजिटल स्पेस वर प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक करण जौहर हा शो होस्ट करताना दिसेल.

त्यामुळे बिग बॉस सीझन-15 मध्ये आता होस्टच्या भूमिकेत सलमान खान नसून करण जौहर झळकणार आहे. व त्यानंतर हा शो टीव्हीवर दिसणार आहे. अशातच आता मोठी माहिती समोर येत आहे.

या शो साठी बिग बॉसच्या घरात येण्यासाठी जुन्या काही स्पर्धकांना आमंत्रित केलं गेलं आहे. व आता न्यूड योगा गुरु व जुना स्पर्धक विवेक मिश्राला अप्रोच केलं आहे. नुकताच त्याने याबद्दलचा खुलासा केला आहे. मेकर्सनी त्याला ‘बिग बॉस OTT’ मध्ये सेमी न्यूड योगचा तडका लावण्यास सांगितलं होतं. मात्र त्याने या मागणीला नकार दिला आहे.

एका मुलाखतीदरम्यान विवेक मिश्रानं या गोष्टीचा खुलासा केला आहे. विवेक म्हणाला की, मला मेकर्सनी ‘बिग बॉस OTT’ मध्ये काम करण्यासाठी ऑफर पाठवली होती. मला सांगण्यात आले की या शो मध्ये मला न्यूड योगचा तडका करायचा आहे. मेकर्सच्या नुसार माझ्या न्यूड योगामुळे शो आणखी रंजक बनेल.

मला सांगण्यात आले की, मेकर्स अशा 5 कंटेस्टेंट्सच्या शोधात आहेत, जे शोला रंजक बनवतील. तसेच त्याने पुढे म्हटलं की, ‘मी अशा एका मोठ्या रिएलिटी शोमध्ये फक्त मसाला आणण्यासाठी न्यूड योगा का करेन? मी खुपचं सेक्सी आहे. आणि मी त्या प्रकारचे योगा करण्यासाठी खुपचं मोठी रक्कमसुद्धा घेतो.

त्यांच्या मागणीवर मी त्यांना स्पष्ट केलं, की मी एका एपिसोडसाठी 50 लाख रुपये घेईन. तसेच त्याने म्हटलं की, मी स्टारलेट नाही किंवा मी फक्त न्यूड योगगुरु म्हणून शोमध्ये दिसू इच्छित नाही’. मी फक्त असे शो घेतो ज्यामध्ये मी कमवून पुढची 5 वर्ष आरामात घालवू शकतो असे विवेक म्हणाला आहे.
महत्वाच्या बातम्या
मराठी शाळेतल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल…
नोराच्या ‘जालिमा कोका कोला’ ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद! तीनच दिवसात पार केला तीन कोटी व्ह्युजचा टप्पा
नादच खुळा! साठी पार केलेल्या आजोबांनी बांधले डोक्याला पुन्हा बाशिंग; सर्वत्र आजोबांची चर्चा
‘आई कुठे काय करते’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अरुंधती घर सोडून गेल्यावर होणार मोठा धमाका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.