बापरे! ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने पैशांसाठी ठेवले होते शारीरिक संबंध

बॉलीवूडमध्ये नाव करणे ही काही सोपी गोष्ट नाही. इथे टिकून राहण्यासाठी तुम्हाला अनेक उलथापालथ करावी लागते. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतरही अनेकांना यात यश मिळत नाही. बॉलीवूडमध्ये यश मिळाले नाही. म्हणून अनेक अभिनेत्री दुसरी काम करायला लागतात.

बॉलीवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर अभिनेत्री यश मिळवण्यासाठी वाईट मार्गाचा अवलंब करतात. त्यामूळे बॉलिवूड अभिनेत्रींच्या देहविक्रीच्या कथा समोर आल्या आहेत. भरपूर पैसे मिळवण्यासाठी अभिनेत्रीनी स्वतःचे शरीराचा बाजार मांडला आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे शर्लिन चोप्रा.

शर्लिनने बॉलीवुडमध्ये काम केले आहे. परंतू तिला हवे तसे यश मिळाले नाही. शर्लिन कलर्सचा प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’च्या सीझन 3 मध्ये देखील दिसली आहे. याशिवाय शार्लिन चोप्रा तिच्या बोल्ड लूकमुळे बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय आहे.

बिग बॉस सीजन 3 मध्ये आल्यानंतर शर्लिन खुप जास्त प्रसिद्ध झाली आहे. पण ती चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत नसली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. त्यासोबतच ती तिच्या बोल्ड अवतार आणि फोटोशूटवरून वादात असते.

शर्लिनने ‘रेड स्वस्तिक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. तिच्या पहिल्याचं चित्रपटामध्ये तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. त्यामूळे ती अनेक दिवस चर्चेत होती. पण हा चित्रपट मात्र फ्लॉप झाला होता.

अभिनयाबरोबरच शर्लिन मॉडेल देखील आहे. ती मॉडेल म्हणून गेले अनेक वर्षे काम करत आहे. याशिवाय प्लेबॉय मासिकासाठी न्यूड फोटोशूट मिळाल्यावर शर्लिन चोप्रा चर्चेत होती.

पण शर्लिनच्या आयुष्यात एक असाही काळ होता ज्यावेळी तिच्याकडे कोणतेही काम नव्हते. त्यामूळे तिला तिच्या कॉलेजची फिस भरण्यासाठी देहविक्री करावी लागली होती. शर्लिनने एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता.

शर्लिनने सांगितले होते की, ‘तिला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खुप जास्त मेहनत करावी लागली होती. एकदा ती परीक्षा जवळ आली होती. तिला फिस भरायची होती. पण तिच्याकडे पैसे नव्हते. त्यामूळे तिने पैशांसाठी लैंगिक संबंध ठेवले होते’.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.