Bigg Boss 19 Kunika Sadanand Son Ayaan: बिग बॉस 19 (Bigg Boss 19) मध्ये सध्या गाजत असलेली अभिनेत्री कुनिका सदानंद (Kunika Sadanand) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी कारण वेगळं आहे. तिचा मुलगा अयान (Ayaan) यानं एका मुलाखतीत आईच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
“आईचे बॉयफ्रेंड होते, जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड होत्या…”
सिद्धार्थ कन्नन (Siddharth Kannan) यांच्या युट्यूब पॉडकास्टमध्ये बोलताना अयान म्हणाला, “जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड होत्या, तेव्हा माझ्या आईचे बॉयफ्रेंड होते. काही पुरुष चांगले नवरे होते, तर काहींनी वडिलांची भूमिका निभावली. मला हे सगळं फार कूल वाटायचं.” अयाननं यावेळी आईच्या घटस्फोटानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख केला आणि खुल्या शब्दांत आईचं कौतुकही केलं.
कुमार सानूसोबतच्या नात्यावर भाष्य
या मुलाखतीत अयाननं कुमार सानू (Kumar Sanu) यांच्यासोबत आईच्या नात्यावरही भाष्य केलं. तो म्हणाला, “मी कुमार सानू यांना प्रत्यक्ष भेटलो नाही, पण त्यांच्या मुलांना भेटलो आहे. जानसोबत मी वेळ घालवला आहे, त्याने मला भावासारखं मानलं.”
अयान पुढे म्हणाला, “मी गूगल सर्च करूनच आईचं आणि कुमार सानू यांचं रिलेशन कळलं. ती घरी त्यांची गाणी गात असे. लोक म्हणतात त्यांचं 27 वर्षांचं नातं होतं, पण प्रत्यक्षात ती तेव्हा 27 वर्षांची होती. माझा जन्म मात्र ती 35 वर्षांची असताना झाला. आई आजही त्यांच्या कलेवर प्रेम करते, व्यक्तीवर नाही.”
कुनिकाची जुन्या मुलाखतीतील कबुली
एका जुन्या मुलाखतीत स्वतः कुनिका सदानंद (Kunika Sadanand) म्हणाली होती, “आम्हाला लोकांनी एकत्र फक्त शोदरम्यान पाहिलं. मी त्यांच्या कपड्यांपासून शोच्या तयारीपर्यंत सगळं सांभाळायचे. मला ते माझे नवरे असल्यासारखं वाटायचं. आमचं नातं शकुंतला-दुष्यंतासारखं होतं. पण नंतर काही गोष्टी समजल्या आणि प्रेमभंग झाला.”