बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवशी “या” दोन स्पर्धकांमध्ये तुफान राडा; कोण होणार एलीमीनेट?

बिग बॉस मराठी सीजन ३ च्या पर्वाला १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवरून रात्री साडे नऊ वाजता तर OTT ॲपवर संध्याकाळी सात वाजता प्रसारित केला गेला आहे.

बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये चित्रपट, टीव्ही, संगीत आणि सोशल मीडियावरील निवडलेल्या लोकप्रिय सेलेब्सचे मिश्रण आहे आणि स्पर्धक 100 दिवसांसाठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.

खरंतर पहिल्याच दिवशी स्पर्धक एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत नसल्याने समजून घेण्याचा प्रयत्न करत होते पण हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि स्नेहा आणि मीरा यांच्यात वाद पेटला. हा वाद जेवणावरून झाला असून यावेळी स्नेहाने मिराचा चांगलाच समाचार घेतला होता.

स्नेहा आणि जय यासोबत आणखी काही स्पर्धक जेवणाबद्दल चर्चा करत होते. मात्र यावेळी तिथे मीरा आली आणि तिने सरळ जेवण पुरेसे मिळाले नाही यावरून हुद्दत घातली. यावेळी स्नेहाने तिचा समोर हात जोडून विनंतीही केली की तुला जेवण मिळेल तरी तिचा आवाज चढला आणि तिने सरळ भांडण केलं.

यावेळी मीराचा उंचावलेला आवाज पाहता तिने देखील मीराला ‘ही काय बोलायची पद्दत आहे का?’ असा प्रश्न केला. पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पडलेली पाहता आता बिग बॉसच्या घरात पुढे काय होते आणि कोण एलीमिनेट होत यावर सर्वांच लक्ष लागून आहे. तसेच स्नेहा आणि मीरा यांच्यामधील हा वाद मिटतो की नाही हे पुढच्या भागात पाहणेही उस्तुकाचे ठरेल

यामध्ये सोनाली पाटील, स्नेहा वाघ याचबरोबर तृप्ती देसाई, उत्कर्ष शिंदे, सुरेखा कुडची,गायत्री दातार, मीरा जग्गनाथ,विकास पाटील, शिवलीला पाटील,आविष्कार दारव्हेकर,जय दुधाणे,संतोष चौधरी, विशाल निकम अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

 

महत्वाच्या बातम्या
युपीतील आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह लटकलेला आढळल्याने खळबळ
महाविकास आघाडी केवळ तडजोड, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, शिवसेनेचे मोठे वक्तव्य
पवनदीपने अरुणिताला नेलं हिल्स स्टेशनवर, हिल्स स्टेशनवर जाऊन दोघांनी केलं ‘हे’ काम, पहा व्हिडिओ
मोठी बातमी! अदानींच्या मालकीच्या मुंद्रा बंदरावर सापडले तब्बल ९००० कोटींचे ड्रग्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.