Share

Malegaon Blast Case Verdict : मालेगाव स्फोट प्रकरणात मोठा निकाल; तब्बल १७ वर्षांनंतर सर्व आरोपी निर्दोष मुक्त

Malegaon Blast Case Verdict:  देशाला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव स्फोटप्रकरणात तब्बल १७ वर्षांनंतर अखेर निकाल जाहीर झाला. मुंबई येथील एनआयए विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. केवळ संशयावरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही, असा ठाम उच्चार करत न्यायालयाने निकाल वाचून दाखवला. 1000 हून अधिक पानांचा सविस्तर निर्णय यात आहे.

भिक्खू चौकातील भीषण घटना

२९ सप्टेंबर २००८ रोजी रमजानच्या महिन्यात मालेगावच्या (Malegaon) भिक्खू चौकात झालेल्या या बॉम्बस्फोटात ६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर १०० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले. या घटनेने अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. मशिदी जवळ ठेवण्यात आलेल्या दुचाकीत स्फोट झाल्याचा तपास यंत्रणेचा दावा होता.

न्यायालयातील महत्त्वाचे निरीक्षण

सरकारी पक्षाने बॉम्बस्फोटाची घटना सिद्ध केली, मात्र स्फोट स्कूटरमध्येच झाला हे पटवून देण्यात ते अपयशी ठरले. पंचनामा योग्य रीतीने न केल्याचं आणि घटनास्थळावरून हाताचे ठसे न जप्त केल्याचं न्यायालयाने नोंदवलं. तसेच स्कूटरचा चेसिस नंबर मिळवण्यात आला नसल्यानेही गंभीर त्रुटी स्पष्ट झाल्या.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh) या दुचाकीच्या मालक असल्याचा पुरावा स्पष्ट नसल्याचेही न्यायालयाने सांगितले. मोक्का (MCOCA) नंतर मागे घेतल्याने, त्या अंतर्गत घेतलेले जबाब निरर्थक ठरले. युएपीए (UAPA) अंतर्गत परवानगी मिळवण्याची प्रक्रिया चुकीची झाल्याचंही नमूद करण्यात आलं.

आरडीएक्स प्रकरणातील गंभीर त्रुटी

कर्नल प्रसाद पुरोहित (Col Prasad Purohit) यांनी आरडीएक्स आणल्याचा ठोस पुरावा नसल्याचे स्पष्ट झाले. बैठकींचे आरोप आणि कथित कटाचा पुरावा न्यायालयाला पटला नाही. त्यामुळे सर्व आरोपींना बेनिफिट ऑफ डाऊट देऊन मुक्त करण्यात आलं.

निर्णयानंतर आरोपी भावूक झाले. साध्वी प्रज्ञा यांनी सांगितलं, “१३ दिवस टॉर्चर सहन केलं, १७ वर्ष अपमानित झाले. भगव्याला दहशतवादी ठरवणाऱ्यांचा आज पराभव झाला. हा हिंदुत्वाचा विजय आहे.”

आरोपींची यादी

  1. प्रसाद पुरोहित (Prasad Purohit)

  2. साध्वी प्रज्ञा सिंह (Sadhvi Pragya Singh)

  3. समीर कुलकर्णी (Sameer Kulkarni)

  4. रमेश उपाध्याय (Ramesh Upadhyay)

  5. अजय राहिरकर (Ajay Rahirkar)

  6. सुधाकर द्विवेदी (Sudhakar Dwivedi)

  7. सुधाकर चतुर्वेदी (Sudhakar Chaturvedi)

उर्वरित काही आरोपी अजूनही फरार आहेत.

१७ वर्षांचा प्रवास
  • 2008 मध्ये एटीएसकडून तपास सुरू, 2011 मध्ये एनआयएकडे हस्तांतर

  • 323 साक्षीदारांपैकी 37 साक्षीदार फितूर

  • सुरुवातीला मोक्का लावला, नंतर मागे घेतला

  • दुचाकी, आरडीएक्स आणि बैठकांचे आरोप पण ठोस पुरावा नाही

  • अखेर 31 जुलै 2025 रोजी सर्व आरोपी निर्दोष मुक्त

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now