उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.महाराष्ट्र विधानमंडळचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांनी शेतकर्यांच्या प्रश्नावरुन दणादणून सोडलं आहे.यादरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभेत चांगलाच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्या प्रकरणी बुधवारी (१मार्च २०२३)अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी फक्त आमदारांचा अपमान केला असून हा महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा अपमान आहे, असे म्हणत सभागृहने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जोरदार भाषण ठोकत संजय राऊत यांची गोची करत त्यांच्यावर कारवाई होईल, असे संकेत दिले आहे. संजय राऊत यांच्या विधानाचा मुद्दा भाजपने विधानसभेत उपस्थित केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी राऊत यांच्या वक्तव्याविरोधात हक्कभंग आणावा, अशी मागणी केली जात आहे.
नार्वेकर यांनी हक्कभंग समितीची घोषणा करून राऊत यांच्या समोरील अडचणी वाढवल्या आहेत. एकंदरीत राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करून त्यांना शिक्षेस पात्र करण्याकडे सत्याधारांचा कल होता. मात्र, राज्यसभा सदस्यावर असा हक्कभंग दाखल करता येत नाही, अशी माहिती समोर आली आहे.
विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी सांगितले की, खासदारांवर हक्कभंग आणण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार केवळ राज्यसभेचे सभापती आणि राज्यसभा सचिवालय यांनाच आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सभागृहाला त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. महाराष्ट्र विधिमंडळ याप्रकरणाबाबत फक्त चौकशी करु शकते.
यादरम्यान, संजय राऊत यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना विधिमंडळाला ‘चोरमंडल’ म्हटले होते. भाजप नेते आशिष शेलार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. आमदारांना चोर म्हटले जात असून हा राज्याचा अपमान असल्याचे ते म्हणाले. भाजपचे दुसरे आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत विशेषाधिकार भंगाची नोटीस दिल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्य
निवडणूक आयोगावरून सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला सणसणीत चपराक; तातडीने दिले ‘हे’ आदेश
कसब्यात जिंकले धंगेकर पण चर्चा बिचुकलेंना मिळालेल्या मतांची? वाचा बिचूकलेंवर किती मतांचा पाऊस पडलाय
कसब्यात कुणामुळे झाला पराभव? भाजपचे हेमंत रासने म्हणाले, माझ्या पराभवाला जबाबदार…