देवमाणूस मालिकेत मोठा ट्विस्ट, दिव्या सिंग मालिकेतून होणार बाहेर, आता होणार ‘ही’ नवीन एन्ट्री

मुंबई। झी मराठीवरील ‘देवमाणूस’ मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरशः भुरळ घातली आहे. मालिकेत दररोज येणाऱ्या नवनवीन ट्वीस्टने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. प्रत्येकाने त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.

अशातच चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. देवमाणूस मालिका रंगात येत असतानाच एसीपी दिव्या सिंग मालिकेत दिसणार नसल्याचं समोर येत आहे. तर तिच्या जागेवर इन्स्पेक्टर शिंदे येणार आहे. अभिनेत्री नेहा खान दिव्या सिंग हे पात्र साकारत होती. तिचं काम प्रेक्षकांना विशेष आवडलं ही होतं.

देवी सिंगचा तिने लावलेला छडा यामुळे मालिकेत रंगत पाहायला मिळाली. पण आता दिव्या दिसणार नाही. तेव्हा देवी सिंगला फासावर लटकणार का? की पुन्हा चालाकीने तुरूंगाबाहर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं. त्यामुळे दिव्या सिंग नसल्याने अनेक चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

सध्या मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. मुख्य गुन्हेगार देवी सिंग पोलिसांच्या ताब्यात आहे. तर कोर्टात आता केस सुरू आहे. पण आताही डॉक्टरचे कारनामे सुरूच आहेत. तर कोर्टाची दिशाभूल करण्याचा तो प्रयत्न करत आहे.

एसीपी दिव्या सिंग डॉक्टरला लवकरात लवकर फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर आता तिला वकील आर्या देशमुखचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे दोघीही शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

या मालिकेबद्दची प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता आहे. मालिकेसोबतच सरू आज्जी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही पात्रे देखील लोकप्रिय झाली आहेत. मात्र आता एसीपी दिव्या सिंग दिसणार नसल्याने मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.