शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Big statement of the Deputy Speaker of the Assembly on the claim made by the Shinde group)
बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिंदे गटाच्या सह्यांचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवण्यात आलं आहे. या पत्रामध्ये अपक्ष आमदारांची देखील नावे आहेत. “अपक्ष आमदारांची मते गृहीत धरली जाणार नाहीत, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितलं आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले की, “शिंदे गटाने पाठवलेल्या पत्रात काही अपक्ष आमदारांची नावंही आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारांना तो अधिकार आहे की नाही हे तपासलं जाईल”, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितले आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरी यांचं पत्र दिलं आहे. ते मी स्विकारलं आहे. माझ्याकडे सुनिल प्रभु प्रतोद आहे हेच पत्र आलंय. त्या दिवशी देण्यात आलेल्या पत्रावर सुनील प्रभु यांनी प्रतोद म्हणून सही केली आहे. माझ्याकडे एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्याकडे २/३ बहुमत असल्याचं कोणतंही पत्र आलेलं नाही दावा करणं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे”, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितले आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ पुढे म्हणाले की, “विशिष्ट गट स्थापन करण्याचं जे पत्र माझ्याकडे आलं आहे.. त्यावर ३०-३२ आमदारांच्या सह्या आहेत त्यातही संशय आहे. आमदार नितीन देशमुख यांनी ते इंग्रजी स्वाक्षरी करतात आणि पत्रावर त्यांच्यासमोर मराठीत स्वाक्षरी आहे असं म्हंटल आहे. त्यामुळे त्यावर तपासणी करावी लागेल.”
“त्यावर अपक्ष आमदारांच्या सह्या असतील तर त्यांना त्याबाबत अधिकार आहे का याचाही विचार करावा लागेल. शिवसेना पक्ष म्हणून अपक्षांची मतं त्यात गृहीत धरली जाणार नाहीत”, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितले आहे. कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो आणि गटनेत्याने प्रतोद निवडायचा असतो, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
अपक्षांची मतं गृहीत धरली जाणार नाहीत, कारण…” विधानसभा उपाध्यक्षांच्या दाव्याने खळबळ
आघाडीत धुमशान! निधी वाटपावरून झालेल्या आरोपांना अजितदादांचे जोरदार प्रत्यूत्तर; म्हणाले..
मला नाही वाटत या बंडखोरीमध्ये भाजपाचा काही रोल आहे – अजित पवार