पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा, आत्महत्येपूर्वी तिने केले होते ‘हे’ काम

पुणे । पूजा चव्हाण आत्महत्या या प्रकरणामुळे राज्यात मोठे राजकीय वादळ उठले होते. यामुळे तेव्हा वनमंत्री व शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला भरपूर दिवस होऊन गेले आहेत.

या प्रकरणी पूजाच्या आई-वडिलांनी वानवडी पोलिसांकडे जबाब नोंदवला होता. मुलीच्या आत्महत्यानंतर घडलेला सर्व प्रकार हे राजकीय नाट्य होते, असा गौप्यस्फोट जबाबात त्यांनी केला होता. त्यानंतर राठोड यांना क्लिनचीट मिळणार, अशी चर्चा रंगली होती.

मात्र पुणे पोलिसांच्या हाती आलेल्या पुजा चव्हाणच्या मृत्यू अहवालामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. व्हिसेरा रिपोर्टमध्ये पूजाने आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केल्याचेही निष्पन्न झाले आहे. दारूच्या नशेत तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

तसेच हा अहवाल प्राप्त झाला, अशी माहिती पोलीसांनी दिली असून या प्रकरणाचा योग्य तपास सुरू असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. पूजा चव्हाण हिची आत्महत्या होण्यापूर्वी तिचा आणि एका व्यक्तीमध्ये झालेले संभाषण व्हायरल झाले होते. या संभाषणातील एक आवाज माजी मंत्री संजय राठोड यांचा असल्याचा अहवाल न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेने दिला होता.

याला पुणे पोलिसांनी अधिकृतपणे दुजोरा दिला असून हा अहवाल दोन महिन्यांपूर्वीच मिळाल्याचे सांगितले आहे. आत्महत्येआधी पूजा आणि राठोड यांच्यात ९० मिनिटे फोनवर बोलणे झाल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांना फॉरेन्सिक अहवालात देण्यात आला आहे.

पूजाच्या आत्महत्येपूर्वी सुमारे ९० मिनिटे पूजा हीच संजय राठोड यांच्याशी फोनवर बोलणे झाल्याची माहिती समोर आली आहे. हे संभाषण वंजारा भाषेत होते. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची तांत्रिकदृष्ट्या तपासणी पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती.

सुरुवातीला १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाले होते. त्यातील दोन व्यक्तीमधील संभाषणात पूजा चव्हाणबरोबर बोलणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा आवाज हा संजय राठोड यांचा असल्याचा वृत्ताला फॉरेन्सिक अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे. आता पुढे या प्रकरणाला काय वळण लागणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

“काय होतीस तू काय झालीस तू…”; ‘तारक मेहता…’मधील सोनूचा विचित्र अवतार पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलाने केला ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार, पैसेही उकळले

मासे धरायला गेलेल्या तरुणासोबत घडला भलताच प्रकार; खेकड्याने करकचून धरला प्रायव्हेट पार्ट आणि…; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.