Share

Uddhav Thackeray : शिवसेना सोडणारे खासदार मला म्हणत होते की पुढच्या निवडणूकीत मोदी…; ठाकरेंचा मोठा खुलासा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह काही काळासाठी गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही धक्का बसला आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांकडून बैठका घेतल्या जात आहे.

अशातच उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी हे घासलेलं आणि संपलेलं नाणं आहे. पण आपल्याकडे बाळासाहेबांसारखं खणखणीत नाणं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आपली ही शेवटची लढाई आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आता ही शेवटची लढाई आहे ती जिंकलो की आपण सगळं मिळवलं. या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत आहात ना, असा सवाल उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना केला आहे. तसेच पुढील निवडणूक जिंकण्याचा विश्वासही दिला आहे.

मी भाजपशी लढलो, कुटुंबातील लोकाशी लढलो. ही लढाई लढून मी आपल्या पक्षाचे ६३ आमदार निवडून आणले. आपल्याकडून फुटण्याआधी खासदार मला म्हणत होते की पुढच्या निवडणूकीत आपल्याला मोदींच्या नावाचा वापर करावा लागेल. मग मला त्यांना हे सांगायचे आहे की तुम्हाला आमच्यातून फुटल्यानंतर बाळासाहेबांच्या नावाची गरज का लागते? असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आयोगाचा निर्णय हा दोन्ही गटांसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयामुळे दोन्ही गटांना दुसरे चिन्ह घ्यावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्याकडे चिन्हासाठी तीन पर्याय आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय उद्धव ठाकरे गटाने निवडले आहे.

या तिन्ही चिन्हांपैकी कोणतेही चिन्ह ठाकरे गट घेऊ शकते. शिंदे गटाबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे अंधेरीच्या निवडणूकीत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट कोणते चिन्ह वापरतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या
one day match : भारताचा साऊथ आफ्रिकेवर दणदणीत विजय; ‘हे’ दोन मुंबईकर खेळाडू ठरले विजयाचे हिरो
uddhav thackeray : उद्धव ठाकरेंनी केली नव्या नावाची घोषणा, ‘ही’ तीन नावं पाठवली निवडणूक आयोगाला
Uddhav Thackeray : ही आपली शेवटची लढाई, त्यानंतर आपण…; जिल्हाप्रमुखांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

राजकारण इतर ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now