सुशांतच्या इमारतीत राहणाऱ्या महिलेचा मोठा खुलासा; म्हणाली १३ जूनच्या रात्री खोलीत…

 

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात त्याने आत्महत्या केल्याची म्हटले जात आहे, मात्र त्याने आत्महत्या का केली? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. तसेच या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे, आता सुशांतच्या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

सुशांतच्या खोलीची लाईट १३ जूनच्या रात्री बंद होती. याआधी कधीही सुशांतच्या खोलीची लाईट बंद होत नव्हती, पण त्यारात्री सुशांतच्या खोलीची लाईट बंद होती, असे त्या महिलेने म्हटले आहे.

सुशांतच्या खोलीची लाईट पहाटे ४ वाजेपर्यंत बंद होत नव्हती. पण त्या रात्री सुशांतच्या खोलीची लाईट रात्री १०:३० च्या दरम्यान बंद झाली होती, तसेच त्यारात्री सुशांतच्या घरी कोणतीही पार्टी झाली नव्हती, असे त्या महिलेने म्हटले आहे.

तसेच त्या महिलेने त्यारात्री काही तरी चुकीचे झाल्याची भीतीही व्यक्त केली आहे. शेजारी राहणाऱ्या महिलेने केलेल्या या विधानाची आता सीबीआय चौकशी करणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.