मोठा खुलासा! खासदार-अभिनेत्री नुसरत जहाँचे लग्नापूर्वी होते ‘या’ आरोपीसोबत प्रेमसंबंध

मुंबई। तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि सुंदर अभिनेत्री नुसरत जहां यांच्या गरोदरपणाविषयी आजकाल बरीच चर्चा आहे. त्यातच ती पती निखिल जैनपासून वेगळी राहत असल्याचाही दावा केला जात आहे. नुसरतच्या गरोदरपणाबाबत ती किंवा तिच्या टीमने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र ‘हिंदुस्तान टाईम्स बंगाल’च्या रिपोर्टनुसार नुसरत ६ महिन्यांची गर्भवती आहे.

दोघंही सहा महिन्यांपासून एकत्र राहत नाहीत. नुसरत आणि आपल्यात संपर्क नसल्याचा दावा खुद्द निखिलने केला आहे. निखिल आणि नुसरत जहां यांचं २०१९ ला लग्न झाले होते. मात्र लग्नाआधी नुसरत जहां हीच एका गॅंग रेपमध्ये नाव आलेल्या व्यक्तीसोबत संबंध होते.

नुसरत जहां राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी कादिर खान याच्याशी संबंध होता. कादिर खान याचे नाव कोलकाताच्या पार्क स्ट्रीट भागातील सामूहिक बलात्काराचा प्रमुख आरोपी म्ह्णून जोडले गेले होते. कादिर खान याला सामूहिक बलात्काराचा मुख्य आरोपी बनविण्यात आले होते.

त्यावेळी नुसरत जहांने आपल्या प्रियकराचा म्हणजेच कादिर खानचा आरोपा पासून बचाव केला होता. तिने त्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहनही केले होते. नुसरत जहां व कादिर खान हे एकमेकांना ४ वर्ष डेट करत होते.

कादिरवर बलात्काराचा आरोप लावण्यापूर्वी त्याची ओळख कुटुंबियांशी झाली होती. मात्र ज्यावेळी त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला, तेव्हा नुसरत म्हणाली की, ती तिच्या कुटुंबाशी डोळ्यात डोळे घालून बोलूही शकत नाही. नुसरत व कादिर हे दोघे कॉलेजमध्ये एकमेकांना भेटले होते, त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते.

त्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा आरोप लागला व तो फरार झाला. ४ वर्षानंतर २०१६ मध्ये त्याला ग्रेटर नोएडा येथून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर १९ जून२०१९ रोजी नुसरत आणि निखिल विवाहबंधनात अडकले होते. मात्र अवघ्या दीड वर्षांतर दोघांच्या नात्यात दरी आल्याचं बोललं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या
लग्नाच्या अगोदर ऋषी कपूरच्या लव्ह गुरु होत्या नीतू सिंग; अनेकदा त्यांच्या गर्लफ्रेंडसोबतचे भांडण सोडवले
याला म्हणत्यात जुगाड! धर्मेद्रच्या स्विमिंग पुलवरून प्रेरीत मुलांनी चालत्या ट्रॅक्टरमध्येच बनवला स्विमिंगपूल
पीडित महिलेला अजित दादांनी ऑन द स्पॉट मिळवून दिला न्याय, पोलिस पतीसह कुटुंबावर दाखल केला गुन्हा
सोनम कपूरच्या लग्नात वडील अनिल कपूरला अश्रू झाले होते अनावर; रडत रडत केले होते मुलीला विदा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.