Share

Shinde Group : शिंदे गटात जाताच प्रताप सरनाईकांना ईडीचा मोठा दिलासा; लवकरच केसही बंद होणार?

Pratap Sarnaik

Shinde Group : टॉप्स ग्रुप सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स प्रकरणात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, आता त्यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम २०१४ मध्ये टॉप्स ग्रुप कंपनीला मिळाले होते. मात्र, भ्रष्टाचार करून एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरवण्याचे कंत्राट मिळवल्याचा आरोप या कंपनीवर होता. यात आमदार प्रताप सरनाईक यांचा हात असल्याचे बोलले जात होते.

तसेच या कंत्राटातून प्रताप सरनाईक यांना मोठा हिस्सा मिळाला असल्याचाही आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय असेलेले एम. शशिधरण आणि अमित चंडोले यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती.

मात्र, बुधवारी टॉप्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक शशिधरण यांचे वकील कुशल मोर यांनी ईडीला क्लोजर रिपोर्टमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे यावर अपील दाखल करण्याचाही प्रश्न उद्भवत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच संबंधित गुन्ह्याचा तपास बंद करण्यात आला असल्याने याप्रकरणी ईडी पुढील कारवाई सुरु ठेवू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडी वाढवू नये अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. त्यानंतर टॉप्स ग्रुपच्या विरोधात ईओडब्ल्यू म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने स्वीकारला आहे.

तसेच २१ सप्टेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही ईडीला देण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रताप सरनाईक यांच्यासाठी मोठा दिलासा समजला जात आहे. तसेच संशयित व्यक्तींना ईडीच्या खटल्यातून मुक्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार असून त्यांना उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जात होते. परंतु, शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

महत्वाच्या बातम्या
Gautam Adani : अदानी बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; एकूण संपत्तीचा आकडा पाहून डोळे फिरतील
Suraj pawar : नायक नहीं खलनायक! ‘सैराट’फेम अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा,पोलिस आवळणार मुसक्या
बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार
Foxconn: ‘या’ कारणामुळे फाॅक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये न्यावा लागला; अखेर मालकांचा खुलासा आलाच

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now