बेरोजगारांना लाॅटरी! कॅगमध्ये ११ हजार जागांसाठी मोठी भरती; ‘असा’ करा अर्ज

नवी दिल्ली | सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे. नव्या वर्षात सरकारने नोकऱ्यांसाठी जाहिरात काढली आहे. CAG Recruitment २०२१ म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक येथे विविध पदांच्या एकूण १० हजार ८११ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

लेवल पाचच्या ऑडिटर आणि अकांऊटंट पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२१ अशी आहे. अधिक माहितीसाठी https://cag.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर अपडेट पाहाता येतील.

अर्ज करण्यासाठी कॅगच्या अधिकृत वेबसाइटवर जा cag.gov.in आणि भरतीच्या अधिसूचनेवर क्लिक करा.
आपण या पदासाठी पात्र असल्यास फॉर्म डाऊनलोड करा यांनंतर हा फॉर्म भरुन दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
यासाठी वयोमर्यादा १८ ते २७ ठेवण्यात आली आहे. ऑडीटर ६४०९ आणि अकाऊंटट ४४०२ याप्रमाणे रिक्त पदे आहेत.

यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच निवडलेल्या भाषेमध्ये आवश्यक निपुणता असावी. या पदांसाठी २९,२०० ते ९२,३०० रुपये वेतन असू शकेल.

देशात विविध राज्यांत भरती प्रक्रिया होत आहे. यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. तर तरुणांनो मग लागा कामाला अर्ज करा. सुवर्ण संधीचा वेळेत फायदा घ्या.

महत्वाच्या बातम्या-
शाब्बास! नोकरी सोडुन तरूणांनी सुरू केली बँक; गावातील तरूणांनाही दिला रोजगार
मोदींविरोधात राष्ट्रीय बेरोजगार मोहीम सुरू असतानाच राज्य सरकारकडून सर्वांत मोठी भरती जाहीर  
आंदोलन चिघळवणाऱ्या भाजपच्या दीप सिंधुला शेतकऱ्यांनी पळवून लावले; पहा व्हिडीओ
राजीनामा देत आमदाराचे मोदींवर गंभीर आरोप; म्हणाले दिल्लीतील हिंसाचार हा तर मोदींचाच डाव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.