मोठी बातमी! निलेश राणे उतरणार विधानसभेच्या आखाड्यात? आमदार होऊदे असं गणपतीकडे साकडं

सिंधुदुर्ग। केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे सुपुत्र निलेश राणे हे कायम चर्चेत असतात. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नारायण व त्यांचे सुपुत्र कायम चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच आता कुडाळ मालवण विधासभेत सध्या शिवसेनेचे वैभव नाईक हे नेतृत्त्व करतात.

वैभव नाईक यांनी 2014 मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व आहे. मात्र आता नारायण राणे यांनी विधानसभेत ज्या मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं, त्याच कुडाळ मालवण मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

कारण आता या मतदारसंघासाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. व यासाठी गणपतीकडे प्रार्थना करण्यात आली आहे. निलेश राणे हे भरघोस मतांनी निवडून येऊन कुडाळ मालवणचे आमदार होऊदे असं साकडं सिंधुदुर्ग राजाला घालण्यात आलं. साकडं घालत असताना निलेश राणे देखील उपस्थित होते.

त्यामुळे आता निलेश राणे आगामी लोकसभेऐवजी, विधानसभेचीच निवडणूक लढवण्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांचा समावेश आहे.

2014 मध्ये यापैकी 2 जागा शिवसेनेकडे तर एक काँग्रेसने जिंकली होती. तर 2019 मध्ये भाजपच्या नितेश राणेंनी एक आणि शिवसेनेने दोन जागी विजय कायम राखला आहे. धुदुर्गातील कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला.

त्यांनी 2014 मध्येही विजय मिळवला होता तर शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा पराभव करुन, नितेश राणे 2019 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले. 2014 मध्ये यापैकी 2 जागा शिवसेनेकडे तर एक काँग्रेसने जिंकली होती. तर 2019 मध्ये भाजपच्या नितेश राणेंनी एक आणि शिवसेनेने दोन जागी विजय कायम राखला.

निलेश राणे यांनी चिपी विमानतळावरून पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे केंद्रामध्ये वजन आहे. त्यामुळेच आता चिपी विमानतळ मार्गी लागतोय. कोण हौसे, गवसे, नवसे खासदार झालेत म्हणून विमानतळ होत नाही, असं निलेश राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
मुनमुन दत्तासोबतच्या रिलेशनशिपबाबत टप्पूने सोडले मौन; प्रतिक्रीया ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
”हा देश आधी इंग्रजांनी आणि नंतर काँग्रेसने लुटला” योगी आदित्यनाथ यांची खरमरीत टीका
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! विराट कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत.. 
अरब राष्ट्रांप्रमाणेच बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी देता येईल का? – इम्तियाज जलील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.