सध्या महाराष्ट्रात ईडीकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई केली जात आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या १०० कोटी लाच मागितल्याचा प्रकरणात तुरुंगात आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) देखील एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत.(big news sharad pawar and pm narendra modi)
मंगळवारी ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची अलिबाग मधील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात २० ते २५ मिनिटे चर्चा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरु असताना ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सध्या महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरु आहे. महाराष्ट्र्रात लवकरच महाविकास आघाडीचे सरकार पडणार असून राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे, अशी विधाने भाजप नेते करत आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे.
त्यामुळे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या भेटीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहिले जात आहे. ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईचे समर्थन करत भाजप नेत्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. यादरम्यान मंगळवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
या एसआयटीमार्फत संजय राऊत यांनी आरोप केलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे ईडी विरुद्ध महाविकास आघाडी सरकार हा संघर्ष वाढत चालला आहे. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली असावी, याची उत्सुकता जनतेला लागली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मी ज्यांना ओळखत होते त्या सगळ्यांसोबत माझ्या पतीचे शारिरीक संबंध होते, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला वेगळे वळण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री, नाव वाचून व्हाल अवाक
एसटी कामगारांना हायकोर्टाचा झटका! विलीनीकरणाची मागणी फेटाळत दिला ‘हा’ शेवटचा अल्टिमेटम