Share

मुंबईत हेल्मेटसक्ती! दुचाकी चालकासह पाठीमागच्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक, नाहीतर होणार ‘एवढा’ दंड

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुचाकी चालकासह पाठीमागे बसलेल्या व्यक्तीला आता हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत(Mumbai) विना हेल्मेट दुचाकी प्रवास करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात मुंबई पोलिस कारवाई देखील करत आहे.(big news mumbai moter cycle rider helmet compulsary)

पण आता मुंबई पोलिसांनी दुचाकी चालकासह पाठीमागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यापुढे दुचाकीवर पाठीमागे बसलेला व्यक्ती विनाहेल्मेट आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

“मुंबई शहरामध्ये अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट दुचाकी चालवतात. तसेच दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती देखील हेल्मेट घालत नाही. दुचाकी चालवणाऱ्या आणि त्याच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट घालणं १९८८ च्या कलम १२६ सह १९४ (ड) नुसार बंधनकारक आहे. या कायदयानुसार विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास ५०० रुपयांच्या दंडाची देखील तरतूद आहे.”

“तसेच या कायदयानुसार विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबित देखील केले जाऊ शकते”, अशी माहिती या पत्रकात देण्यात आलेली आहे. या निर्णयाची अमंलबजावणी १५ दिवसानंतर करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यासंदर्भात वाहतूक पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत.

१५ दिवसानंतर जर एखादा दुचाकीस्वार किंवा त्याच्या पाठीमागे बसलेला व्यक्ती विनाहेल्मेट आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर लोक विनाहेल्मेट प्रवास करत आहेत. यावेळी अपघात झाल्यास दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते.

तसेच यासंदर्भात कायद्याची देखील तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता विनाहेल्मेट प्रवास करता येणार नाही. वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाचे काही सामाजिक संघटनांनी स्वागत केले आहे. वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयावर अद्याप मुंबईतील रहिवाशांकडून प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या :-
काॅंग्रेसचे बडे नेते कपिल सिब्बल यांनी दिला पक्षाचा राजीनामा; आता जाणार ‘या’ पक्षात
काँग्रेसच्या देशपातळीवरील मोठ्या नेत्याचा राजीनामा, सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाणार
संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देणार होतो, पण आता…; संजय राऊतांनी आरोप फेटाळत स्पष्टच सांगितलं

 

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now