मोठी बातमी; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर बांधणार हाती घड्याळ; लवकरच करणार पक्षप्रवेश

पुणे। महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 16 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकरांचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

सुरेखा पुणेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होत्या. सुरेखा पुणेकर यांना विधान परिषदेवर आमदार व्हायची इच्छा आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्कही केला होता.

जुलै महिन्यात त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. व आता त्या अगदी आनंदाने राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकरांबरोबर एकूण 12 कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली आहे.

सुरेखा पुणेकर म्हणाल्या आहेत की, आतापर्यंत कलेची सेवा केली आहे. आता राजकारणात जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळेच 16 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

त्यामुळे आता सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशाआधीच राजकारणात चांगलीच खळबळ सुरु आहे. सुरेखा पुणेकर यांच्याबद्दल बोलायचे झालेच तर महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी म्हणून सुरेखा पुणेकरांची ओळख आहे.

या रावजी तुम्ही बसा भावजी , पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, कारभारी दमानं या त्यांच्या लावण्या खूप गाजल्या आहेत. मध्यतंरी त्या बिग बॉसमधेही नजरेस पडल्या होत्या. व आता लवकरच हाती घड्याळ बांधणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
काय डोकं आहे! चक्क फिल्मी अंदाजात चमचाने बोगदा खाणुन कैदी तुरुंगातुन फरार 
‘मुंबई इंडियन्स’ टीमला मोठा धक्का! रोहित शर्मा IPL च्या सामन्यांना मुकणार? 
ऐन सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! ‘ह्या’ तारखेपासून गॅस आणि PNG प्रचंड महागणार 
एकेकाळी बोंबील विकणारा मन्या कसा झाला मनोहरमामा?; जाणून अटक झालेल्या मनोहर भोसलेबद्दल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.