मोठी बातमी ! उद्यापासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू होणार; पासचीही गरज नाही

मुंबई | अगदी तीन दिवसांवर गणेशोत्सव ठेपलेला असताना आणि राज्यातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेता एसटीने आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २० ऑगस्टला म्हणजे उद्यापासूनच एसटी सुरू होणार आहे.

विशेष म्हणजे याकरिता कसल्याही पासची गरज नाहीये. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊननंतर २३ मार्चपासून एसटी बंद ठेवण्यात आली होती. २२ मेपासून राज्यातील रेड झोन आणि कंटेंटमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू करण्यात आली होती.

पण त्याकडे प्रवाशांनी दुर्लक्ष केले होते. पण आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. त्यानुसार एसटीची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. नागरिकांना गावाकडे प्रवास करण्यासाठी महत्वाचे वाहन एसटी आहे.

एसटी बंद असल्याने नागरिकांना खाजगी वाहन करून गावाकडे जायला लागत होते. त्यामुळे नागरिकांचे आर्थिकरित्या नुकसान होत होते. आता गणेशोत्सव आल्याने नागरिकांची खूप गैरसोय झाली असती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशोत्सव असल्यामुळे नागरिकांना प्रवास करता यावा ही मागणीसुद्धा जोर पकडत होती. त्यानुसार राज्य सरकारने अखेर आंतरजिल्हा एसटी सुरू करण्यास एसटी महामंडळाला परवानगी दिली आहे. परंतु ही वाहतून टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.