सध्या भारतात इलेक्ट्रिक बाईकची क्रेझ वाढताना दिसत आहे. सर्व दुचाकी वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करत आहेत. आता रॉयल एनफिल्ड(Royal Enfield) कंपनी देखील इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. रॉयल एनफिल्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.(big news for bullet lovers Royal Enfield launch new electric bike)
रॉयल एनफिल्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल म्हणाले की, “कंपनी इलेक्ट्रिक दुचाकींवर वेगाने काम करत आहे. उत्पादन आणि जागतिक बाइक मार्केटनुसार इलेक्ट्रिक बाइकची श्रेणी आणि वैशिष्टये यावर चर्चा केली जात आहे”, असे सिद्धार्थ लाल म्हणाले आहेत.
रॉयल एनफिल्डचे सीईओ विनोद दासारी यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रिक बाईकसंदर्भात विधान केलं होतं. “रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईक २०२३ मध्ये कधीही लाँच करण्यात येईल. त्यासाठी कंपनीने ब्रिटनमध्ये रिसर्च देखील सुरु केली आहे. या बाईकची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल”, असे रॉयल एनफिल्डचे सीईओ विनोद दासारी यांनी सांगितले होते.
यानंतर रॉयल एनफिल्ड कंपनीने २०२०-२१ च्या वार्षिक अहवालात देखील सांगितले होते की, कंपनी बाइकच्या इलेक्ट्रिक रेंजवर काम करत आहे. TVS, Hero, Ather आणि BMW सारख्या मोठमोठ्या वाहन उत्पादक कंपन्या येत्या काही महिन्यांत भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. रॉयल एनफिल्ड देखील या स्पर्धेत त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.
रॉयल एनफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाइक्स भारतात आणि परदेशात बाजारात पोहोचवण्यासाठी उत्पादन लाइन तयार करण्यात आली आहे. पर्यावरण आणि लोकांच्या भवितव्याची काळजी करण्यासोबतच सरकारच्या व्हिजनवर देखील काम करण्यात आले आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक बाईकसोबत ८ ते १० किलोवॅट-तास बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. जो मजबूत इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असेल. तसेच सध्याचे या बाईकची मोटर ४० Bhp पॉवर आणि १०० Nm पीक टॉर्क असणार आहे. येत्या काही दिवसांत रॉयल एनफिल्ड कंपनीकडून इलेक्ट्रिक बाईकची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :-
कौतुकास्पद! शेतकऱ्यांसाठी १५ वर्षीय मुलाने बनवलं एक खास अँप, एका क्लिकवर मिळणार शेतीची माहिती
स्वतःची कथा पडद्यावर पाहून प्रवीण तांबे झाले भावूक; म्हणाले, ‘स्वप्न पाहा, एकदिवस ते नक्की पूर्ण होतात’
लवकरच अंकिता लोखंडेच्या घरीही हालणार पाळणा? लॉकअपमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली..