मोठी बातमी! अखेर अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी आली निगेटिव्ह

 

मुंबई। राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यातून मोठं मोठे नेते तसेच प्रसिद्ध कलाकार देखील आपला बचाव करू शकले नाहीत. अशात एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांना कोरोना झाल्याची माहिती ११ जुलैला रात्री उशिरा समोर आली होती. त्यानंतर दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले होते.

मात्र त्यांच्यावर घरामध्येच उपचार केले जात होते. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती उत्तम असून दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते.

त्यामुळे नानावटी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दरम्यान अमिताभ बच्चन यांची ऑक्सिजन लेवल आणि ब्लड प्रेशर सामान्य असल्याची माहिती नानावटी रुग्णालयाचे डॉक्टर अली इराणी यांनी दिली होती.

अखेर आज अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता लवकरच त्यांनी घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.