मोठी बातमी! मनोहर मामा विरोधात महिला भक्ताकडून बलात्काराचा गुन्हा दाखल

पंढरपूर। काही वेळापूर्वी संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक करणारे मनोहरमामा ऊर्फ मनोहर भोसले यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

मनोहर मामाला बारामती न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपासून त्यांनी अनेक भक्तांना आर्थिक गंडा घातल्याचे आरोप झाले होते. या संदर्भात त्यांनी पुण्यात आपल्या वकिलासह पत्रकार परिषद घेत या आरोपांचे खंडन केले होते.

मात्र त्यानंतर मनोहर मामा भोसले याच्यावर अनेक आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातच आता एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 376 2 n,‌ 376 d, 354 385 व अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 नुसार गुन्हा‌ दाखल केला आहे.

बाळूमामांचे भक्त म्हणवणाऱ्या मनोहर मामांकडे शेजारच्या जिल्ह्यातील एक महिला भक्त घरगुती अडचणींमुळे सल्ला घेण्यासाठी काही महिन्यापूर्वी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मठात आली होती. यावेळी आपला लैंगिक छळ झाल्याची तक्रार आता या महिलेने दिली असून आर्थिक फसवणूक झाल्याचेही तिने करमाळा पोलिसांना सांगितले आहे.

मनोहर मामा भोसले याच्यासह त्याच्या दोन अन्य सहकाऱ्यांच्याविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत त्यांनी फसवणूक केली.

याप्रकरणी तिघांवर फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा आणि उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व आता मनोहर भोसलेला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बारामती न्यायालयाने मनोहरमामाला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
ब्रेकींग! मुख्यमंत्र्यांचा मुदतीआधीच तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ 
फक्त पैसे कमावण्यासाठी BCCI ने धोनीला टिम इंडीयात घेतलय; वाचा पडद्यामागचे सत्य
“आज माझे आणखी एक स्वप्न पुर्ण झाले, आईवडीलांना विमानात बसवले”; नीजर चोप्राची भावूक पोस्ट
सैफ अली खानच्या घरी बाप्पा विराजमान; तैमुरने स्वत:च्या हाताने बनवलेल्या मुर्तीचे सर्वत्र कौतुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.