मोठी बातमी! मुंबईत पुन्हा संचारबंदी लागू; कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

मुंबई | मुंबईत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुंबईतील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत ४ पेक्षा अधिक लोकांना बाहेर फिरण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

ही संचारबंदी आहे लॉकडाऊन नाही असं सांगण्यात आले आहे. फक्त अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या लोकांना प्रवासाची मुभा असणार आहे. पण तेसुद्धा सोशल डिस्टनसिंग पाळूनच. किमान ६ फुटांचे अंतर राखून सगळे व्यवहार केले जातील.

महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. बाहेर जाताना मास्क बंधनकारक आहे. सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळावेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील नियम शिथिल करत जाईल.

राज्यातील व्यवहार सुरळीत करण्याचा हा प्रकार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नियम कडक करण्यात आले आहेत. कोरोनाच्या प्रसारामुळे मुंबई शहराला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी एकापेक्षा जास्त व्यक्तीला परवानगी नाही.

धार्मिक स्थळांवर कुठेही कुठल्याही प्रकारची गगर्दी करण्यास मनाई आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या आणि घोळका करणाऱ्या व्यक्तींची उपस्थिती किंवा हालचालींवर लक्ष ठेऊन कारवाई करण्यात यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.