Big News : वॅक्सिनशिवाय कोरोना होणार हद्दपार; कसा ते वाचा सविस्तर..

 

वॉशिंग्टन। वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूला मारणारे एअर फिल्टर तयार केल्याचा दावा केला आहे. या एअर फिल्टरमध्ये कोरोना विषाणूचा प्रवेश झाल्यास तो मरुन जातो. त्यामुळे बंद जागेतील त्याचा प्रसार रोखला जाईल, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

हे एअर फिल्टर शाळा, रुग्णालये, विमानतळ आणि इतर वाहतुकीच्या ठिकाणी वापरले जाऊ शकते. त्यामुळे कोरोना विरोधात लढण्यासाठी प्रभावी शस्त्र मिळाल्याचे बोलले जात आहे.

जर्नल मटेरिअल टुडे फिजिक्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, हे फिल्टर ९९.८ टक्के कोरोना विषाणूला सिंगल पासमध्ये मारुन टाकते. या फिल्टरमध्ये निकेल फोमला २०० डिग्रीपर्यंत तापवले जाते.

त्यामुळे सर्व प्रकारचे विषाणू यात मारले जातात. कोरोना विषाणू हवेमध्ये ७० डिग्री तापमानाला जिवंत राहु शकत नाही. त्यामुळे एअर फिल्टरमध्ये तापमान २०० डिग्रीपर्यंत वाढवून विषाणूनला तात्काळ मारले जाते.

“निकेल फोम एअर फिल्टरमध्ये महत्वाची भूमिका बजावते. हे सछिद्र असल्याने यातून हवा ये-जा करु शकते. निकेल फोम विद्युत वाहक असल्याने ते तापते. शिवाय एअर फिल्टरमधून बाहेर पडणाऱ्या हवेचे तापमान कमी केले जाते.

त्यामुळे याचा वापर एअर कंडिशनींग सारखा केला जाऊ शकतो. घरामध्ये किंवा बंद ठिकाणी एअर फिल्टर प्रभावी ठरु शकते. सध्याचा कोरोना विषाणू किंवा भविष्यात उद्भवू शकणाऱ्या महासाथींचा यामुळे सामना केला जाऊ शकतो”, असे अभ्यासगटाचे सदस्य फैसल चीमा म्हणाले आहेत.

फिल्टरची कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची क्षमता समाजासाठी महत्वाची ठरु शकते. शाळा, वाहतुकीची ठिकाणी, रुग्णालय आणि कार्यालये याठिकाणी हे एअर फिल्टर प्राधान्याने पुरवण्यात येतील, असे फिल्टर निर्मितीच्या कामात गुंतलेल्या कंपनीने म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.