Big News: गलवान खोऱ्यातील शहीद जवानांवर अजय देवगण बनवणार सिनेमा

मुंबई | बॉलिवूडचा सुपरस्टार आणि निर्माता अजय देवगण गलवान खोऱ्यातील शहीद जवानांवर सिनेमा बनवणार आहे.

या चित्रपटामध्ये त्या २० जवानांची कहाणी असणार आहे. जे चिनी सैन्याचा सामना करताना शहीद झाले होते. या सिनेमामध्ये अजय देवगण स्वत: काम करणार आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.

पूर्व लडाख या ठिकाणी असणाऱ्या गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी चिनी सैन्याविरुद्ध भारतीय सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरगती प्राप्त झाली.

या सिनेमामध्ये काम करणारे कलाकार कोण असतील हे अजून निश्चित करणे बाकी आहे. मात्र, या सिनेमाचे सहनिर्माते अजय देवगण फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्ज एलएलपी असणार आहेत.

दरम्यान, अजय देवगणचा भूज : The Pride of India हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अजय बरोबरच संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अॅमी विर्क आणि शरद केळकर हे कलाकार दिसणार आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.