लालबागच्या राजाचा मोठा निर्णय: यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना होणार नाही तर…..

मुंबई | मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या संकटावर मात करण्यासाठी लालबागचा राजा गणेश मंडळाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणपती बाप्पाची मूर्ती न बसवण्याचे ठरवले आहे. त्याऐवजी ११ दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवला जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा न करता, आरोग्यसेवा करून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबाग गणेश मंडळाने घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील या निर्णयाचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट करत या गणेश मंडळाचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, कोरोना लढ्यात जे पोलीस शिपाई आणि अधिकारी शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबांचा सन्मान मंडळाच्या वतीने केला जाणार आहे.

मंडळाच्या या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनीही स्वागत केले. पुढे ते असेही म्हणाले की, लालबागच्या राजाने जनतेसमोर नेहमीच आदर्श ठेवला आहे.

आरोग्यसेवा करून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबाग गणेश मंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.