मोठा निर्णय! संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे नवे कठोर नियम जारी, डेल्टा प्लसमुळे केले बदल

मुंबई। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हळूहळू होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतील वाढ आणि डेल्टा प्लसचे आढळून आलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारनं नव्यानं नियमावली जारी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा धोका निर्माण झाला आहे.

नवीन नियमावली नुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र केंद्र सरकारच्या नियमानुसार जिल्ह्यांना तिसऱ्या टप्यातील निर्बंध लागू करावे लागणार आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेता नियम जारी करण्यात येणार आहेत.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर द्वारे होणाऱ्या चाचण्यांचा पॉझिटीव्हीटी रेट लक्षात घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तिसऱ्या लेवलपेक्षा कमी म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करायचे असतील तर त्यांना मागील दोन आठवड्यातील कोरोना रुग्णसंख्येचा अभ्यास करावा लागेल. जर कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असेल तर वरील टप्प्यातील निर्बंध लागू करावे लागतील.

तिसऱ्या टप्प्यातील नियमांनुसार अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील.

लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल. 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल, रविवारी बंद.

मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी 2 पर्यंत सुरु असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

या नियमावलीनुसार आता तिसऱ्या टप्यात निर्बंध लागू करण्यात आले असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने सतर्कतेची पाऊले टाकली आहेत. सध्या महाराष्ट्रात डेल्टा प्लस वेरियंटचे 21 रुग्ण समोर आले होते त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.