मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिलं आहे. नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgaovkar) देखील उपस्थित होते.(Big decision in Raj Thackeray’s meeting)
आज राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी मनसे पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक विभागातील मनसे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात देखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीसंदर्भात माहिती देताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, “या बैठकीत तीन महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. १ मे, ३ मे आणि ५ जून या तीन तारखा पक्षाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. या दिवशी पक्षाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे”, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पुढे सांगितले की, “१ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या सभेसंदर्भात सूचना दिल्या आहेत.”
“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. तसेच ३ मे या दिवशी अक्षय तृतीया आहे. त्यामुळे ३ मे ही तारीख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी महत्वाची आहे. या दिवशी मुंबईत महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात माहिती देताना बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, “मनसेच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा असणार आहे. पाच जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील अयोध्येला जाणार आहेत. दौऱ्यात राज ठाकरेंची सभा देखील होणार आहे. या सभेसाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी अयोध्येत जाऊन रेकी देखील केली आहे”, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मुस्लिमांना नष्ट करण्यासाठी सुरू आहे खतरनाक बुलडोझर राजकारण, इस्लामिक संघटना न्यायालयात
KGF 2 च्या वादळाने सगळे चित्रपट झोपवले, चार दिवसात एवढ्या कोटींचा आकडा पार, RRR चा रेकॉर्ड मोडणार?
PHOTO: प्रेग्नेंट असतानाही रिहानाने बोल्डनेसच्या तोडल्या सर्व मर्यादा, टॉपलेस होत बाथटबमध्ये केलं फोटोशूट