Share

मुंबईतील मशिदींचा मोठा निर्णय! ७२% मशिदी पहाटेचे भोंगे स्वताहून बंद करणार

मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील(Mumbai) ७२% मशिदींनी पहाटेचे भोंगे बंद केल्याची माहिती मिळत आहे. मशिदींनी स्वतःहुनच पहाटेचे ५ वाजताचे भोंगे बंद केले आहेत. पोलिसांच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. मशिदीच्या संस्थाचालकांनी पुढाकार घेत पहाटेचे भोंगे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.(Big decision for mosques in Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ७२% मशिदींनी पहाटे ५ वाजताचे भोंगे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मशिदींनी स्वतःहुन एक पाऊल पुढे टाकत मशिदींवरील पहाटेचे भोंगे बंद केले आहेत. पहाटेच्या वेळी मशिदींमध्ये अजाण होईल पण लाउडस्पीकर बंद असतील, असे मशिदीच्या संस्थाचालकांनी सांगितले आहे.

पण दुपारचे आणि संध्याकाळचे भोंगे मात्र सुरु राहणार आहेत. लाउडस्पीकरबाबत आवाजचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, असे देखील मशिदीच्या संस्थाचालकांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम देखील राज ठाकरे यांनी दिलं आहे.

‘तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु’, असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. यामुळे राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. नुकताच नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी भोंग्यांबाबत एक महत्वाचा आदेश दिला आहे.

नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांनी ३ मे पर्यंत भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी, असा आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगी न घेतल्यास पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल, असे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले आहे. सर्व धार्मिक स्थळांनी ध्वनिक्षेपकाच्या आवाजाच्या तीव्रतेच्या संदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे देखील दीपक पांडे यांनी सांगितले आहे.

सर्व धार्मिक स्थळांनी आवाजाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं होत. सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे आणि ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले होते. यानंतर मुंबईतील मशिदींनी पहाटेचे भोंगे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मशिदींवरील भोंग्यासंदर्भात राज्य शासनाला अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय?
भाजपा नेत्याचा घरचा आहेर; ‘आर्थिक प्रगतीचं लक्ष्य गाठण्यास नरेंद्र मोदी अपयशी’
चहलने हॅट्रीक घेताच धनश्री वर्माने सुरु केला डान्स, आनंदाच्या भरात मैदानातच…; व्हिडिओ झाला व्हायरल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now