मुंबईकरांसाठी(Mumbai) एक चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबई शहराजवळ असणाऱ्या अरबी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. तापमानवाढीमुळे हे घडत आहे. या गोष्टी अशाच सुरु राहिल्यास मुंबईवर चक्रीवादळाचे संकट निर्माण होऊ शकते, असे अहवालातून समोर आले आहे. यामुळे मुंबई शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.(big cyclotron come in mumbai?)
या संदर्भात ‘इंटरगव्हरमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत राहिली तर २०५० पर्यंत सुमारे पाच हजार कोटींचे नुकसान होईल, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. २०७० पर्यंत यामध्ये २.९ पटीने वाढ होईल, असे देखील या अहवालात सांगण्यात आलं आहे.
मुंबई महापालिकेने सध्या कोस्टल रोडचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने या प्रकल्पात पुराचा धोका कमी करणे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्यापासून सरंक्षण करण्याकडे लक्ष दिले जात आहे. तरीही यामुळे भरती ओहोटी क्षेत्रातील प्राणी, वनस्पती आणि मासेमारीला धोका पोहचू शकतो.
मुंबईजवळ होणाऱ्या तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. तसेच मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या चक्रीवादळांत देखील वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भविष्यामध्ये मुंबई शहराला चक्रीवादळाचे परिणाम अधिकरीत्या जाणवतील, असे या अहवालात सांगण्यात आलं आहे. याचा परिणाम मुंबईतील रहिवाशांवर होणार आहे.
या अहवालात भारतातील इतर शहरांनाही चक्रीवादळाचा धोका असल्याचे सांगितले आहे. मुंबई, कोलकत्ता(Calcutta) आणि चेन्नई(Chennai) या शहरांना वाढत्या समुद्रपातळीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. जर मुंबई शहरातील उत्सर्जन वेगाने कमी केले नाही तर उष्णता आणि आर्द्रता वाढेल. त्यामुळे शहराजवळच्या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल.
याचे परिणाम शहरातील नागरिकांना भोगावे लागतील. या गोष्टी रोखण्यासाठी शहरातील ग्रीन पायाभूत सुविधा वाढवणे गरजेचे आहे. तसेच शहरातील हिरवाईवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तसेच मुंबई शहराजवळच्या भागात कांदळवनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जैवविविधतेचे सरंक्षण करणे गरजेचे आहे.