मोफत एलपीजी कनेक्शनच्या नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या बदलेले नवीन नियम

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून एलपीजीवर सबसिडी मिळवणाऱ्या ग्राहकांसाठी वेगवेगळे नियम बदलत आहेत. आता देखील उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी गॅस कनेक्शनवर मिळणाऱ्या सबसिडीत मोठा बदल होऊ शकतो. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत नवीन कनेक्शनसाठी अनुदानाच्या विद्यमान रचनेत बदल होऊ शकतो. याबाबत दोन नवीन संरचनांवर काम सुरू केले असून ते लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात एक कोटी नवीन कनेक्शन देण्याची घोषणा केली होती, असे असले तरी यामध्ये बदल केला जाऊ शकतो. उज्ज्वला योजनेंतर्गत ग्राहकांना सिलेंडर आणि स्टोव्ह दिला जातो. त्याला सरकारकडून 1600 रुपये अनुदान मिळते.

तसेच ऑइल मार्केटिंग कंपन्या 1600 रुपये आगाऊ देतात. OMC रिफिलवर EMI म्हणून सबसिडीची रक्कम आकारतात. उज्ज्वला योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबातील महिला गॅस कनेक्शनसाठी अर्ज करू शकते. याबाबत प्रक्रिया सोपी आहे

यासाठी तुम्हाला प्रथम एक फॉर्म भरावा लागेल आणि तो जवळच्या एलपीजी वितरकाला द्यावा लागेल. यामध्ये अर्ज केलेल्या महिलेला तिचा संपूर्ण पत्ता, जन धन बँक खाते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक द्यावा लागेल. तिची सगळी माहिती भरावी लागेल.

त्यावर प्रक्रिया केल्यानंतर, देशातील तेल विपणन कंपन्या पात्र लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन जारी करतात. ग्राहकाने EMI निवडल्यास, EMI रक्कम सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसिडीमध्ये समायोजित केली जाते. अशी साधी पद्धत आहे. याबाबत अधिकृत वेबसाइट pmujjwalayojana.com ला भेट देऊन या योजनेची संपूर्ण माहिती मिळेल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.