दगडूशेठ गणपतीच्या पुजेत यंदा मोठे बदल; जाणून घ्या कशी होणार यावर्षीची पूजा

पुणे | पुणे म्हणले की सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो श्रीमंत दगडूशेठ गणपती. पुणेकरांचे आणि महाराष्ट्रातील अनेक गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेला दगडूशेठ गणेशोत्सवात सगळ्यात आकर्षणाचा विषय असतो. अनेक जण फक्त दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लांबून येत असतात.

दरवर्षी दगडूशेठ गणपतीची सजावट ही भक्तांसाठी नयनरम्य असते. पण यंदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना बेलबाग चौकात मांडव घालून होणार नाही.

गणेशोत्सव नसताना मूर्ती ज्या फराजखाण्याजवळच्या मंदिरात असायची त्याच मंदिरात यावेळेस असेल आणि तिथेच गणेशोत्सव साजरा होईल. नेहमीप्रमाणे पार्थिव गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि सर्व विधी पार पाडून पूजा होईल.

यावर्षी साधेपणाने सजावट करण्यात येईल. पहिल्यांदा कोरोनामुळे या प्रकारे गणपतीची पूजा मंदिरात करण्यात येईल नाहीतर दरवर्षी मोठ्या थाटात दगडूशेठ गणपती विराजमान होत असतात. याच गणपतीसाठी दरवर्षी मोठमोठ्या रांगा लागतात. पण यावर्षी असाच गणेशोत्सव साजरा होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.