Big Breaking : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

 

पुणे। राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. पुण्यात देखील दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ होताना दिसत आहे.

अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत स्वतः महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. “थोडासा ताप आल्याने मी माझी COVID -19 ची टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे.

माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील”.

अशा आशयाचे ट्विट करत मुरलीधर मोहोळ यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती नागरिकांना दिली आहे. दरम्यान आज सकाळी माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

दत्ता साने यांच्या जाण्याने पिंपरी चिंचवड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक राजकीय नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून दत्ताकाकांना श्रद्धांजली वाहत आहेत.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.