बिग ब्रेकींग! NCB ने बाॅलीवूड ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपीला मुद्देमालासह केली अटक

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांना अटक करण्यात आली आहे. पण आता NCB ने पुन्हा एका मुख्य आरोपीला अटक केली आहे.

NCB च्या अधिकाऱ्यांनी राहील रफत विश्रा उर्फ सॅम याला अटक केली आहे. दरम्यान, याआधी NCB ने तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्या जामिनावर शुक्रवारी सुनवाई होणार होती. सुशांतच्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर NCB च्या रडारवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत.

ड्रग्स आरोपातील सर्व सहा आरोपी भायखळा जेलमध्ये आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, अब्दुल बासित परिहार, शोविक चक्रवर्ती हे सगळे भायखळा जेलमध्ये आहेत. मिरांडा, अब्दुल आणि दीपेश सावंत या तिघांचा जामीन अर्ज यापूर्वी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

दरम्यान, ड्रग्स प्रकरणात मुख्य आरोपी अंकुश अरनेजा याच्या चौकशीत महत्वाची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी राहील रफत विश्राम उर्फ सॅम याला अटक केली आहे. सॅम याच्याकडून ९२८ ग्रॅम चरस जप्त करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे ४ लाख ३६ हजार रुपये एवढी रक्कम जप्त करण्यात आली आहे. सॅम हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकांना ड्रग्स पुरवायचे काम करत होता अशी माहिती NCB ला मिळाली आहे. त्यामुळे आता NCB पुढील कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न यांचे मानधन ऐकून तुम्हाला येऊ शकते चक्कर

अकाली दल, शिवसेना हे एनडीएचे महत्वाचे आणि शेवटचे स्तंभ होते- संजय राऊत

रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकचं सीक्रेट चॅट आलं समोर; झाला सर्वात मोठा खुलासा

..तेव्हा शिवसेनेला मराठा आरक्षणात रस नव्हता; रावसाहेब दानवेंचा गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.