big breaking! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीची छापेमारी, सकाळपासून झाडाझडती सुरु

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवास्थानी म्हणजेच नागपूरच्या घरावर ईडीच्या टीमने छापा टाकला आहे. अनिल देशमुख यांच्या घराची सकाळी ८ वाजल्यापासून ईडीचे अधिकारी झाडाझडती करत आहेत. अनिल देशमुखांच्या घराबाहेर सकाळपासूनच केंद्रीय पोलीस दलाचे सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत.

उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे. याच अंतर्गत हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. मात्र एकीएकडे अनिल देशमुख यांच्या घराची झाडाझडती सुरु आहे, तर दुसरीकडे अनिल देशमुख सध्या घरात नसून ते दौऱ्यावर असल्याचं कळत आहे.

देशमुख कुटुंबीय घरात आहेत. याआधी मे महिन्यात देखील अनिल देशमुखांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यात महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्यात राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

विरोधी पक्षाकडून सरकारवर सतत टीका करण्यात येत आहे. अशातच परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. मात्र आता अनिल देशमुख यांच्य नागपूरच्या घरावर ईडीच्या टीमने छापा टाकला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.