राहुल वैद्यला मागे टाकत रुबीना दिलैक ठरली बिग बॉस १४ची चॅम्पियन…

मुंबई : रविवारी ‘बिग बॉस १४′ चा महाअंतिम सोहळा संपन्न झाला. प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या या टिव्ही शोचा विजेता घोषित करण्यात आला आहे. राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांच्यात शेवटपर्यंत काँटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र, अखेर रुबीना दिलैकने बाजी मारत बिग बॉस १४व्या सीझनची विजेता ठरली आहे. तर राहुल वैद्य उपविजेता ठरला आहे.

या ‘शो’मधील विशेष बाब म्हणजे प्रत्येक वेळी विविध मुद्द्यांवर रुबीनाचा राहुल वैद्यशी वाद झाला. घरात तिचे सर्वात मोठे भांडण राहुल वैद्यसोबतच झाले होते. आणि अंतिम फेरीतही दोघांमध्ये कडवी झुंकाटें की टक्कर पाहायला मिळाली. पण राहुल वैद्यला मागे सारत रुबिनाने बाजी मारली.

सलमान खानने आपल्या शैलीत महाअंतिम सोहळ्याची सुरुवात केली. सुरूवातीला राखी सावंत १४ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. ज्यावेळी राखी घराबाहेर पडली त्यावेळी सलमानने राखीला विचारले, तुला काय वाटते बिग बॉस कोण जिंकेल? त्यावेळी राखीने रूबीनाचं नाव घेतले होते.

तर दुसरीकडे कमी वोट मिळाल्यामुळे राखीनंतर अली गोनी हा घराबाहेर पडला. अली गोनीनंतर निक्की तांबोळी घराबाहेर पडली. त्यानंतर बिग बॉस १४ ची विजेता म्हणून रुबीना दिलैकच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर राहुल वैद्य बिग बॉस १४ चा उपविजेता ठरला.

महत्त्वाच्या बातम्या
पूजा चव्हाण आत्मह.त्या! पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच तृप्ती देसाईं जोडले हात अन्…
सावधान! कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीपेक्षाही जास्त धोकादायक, एम्स प्रमुखांनी केलं सावध
पुजाला यवतमाळला मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं; नातेवाईकांचा गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.