‘मुंबई इंडियन्स’ टीमला मोठा धक्का! रोहित शर्मा IPL च्या सामन्यांना मुकणार?

मुंबई। कोरोना विषाणूच्या महामारीचा संपूर्ण देशाला फटका बसला. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने आयपीएलच्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. व त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांवर स्थगिती आली.

मात्र आता आयपीएलचे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहेत. मात्र त्याआधीच एक मोठी व ‘मुंबई इंडियन्स’ च्या चाहत्यांसाठी धक्का देणारी माहिती समोर येत आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. या तर जाणून घेऊयात या मागचं नेमकं कारण.

मुंबई इंडियन्स टीम जरी आयपीएल खेळण्यासाठी सज्ज असली तरी संघाचा कर्णधार रोहित शर्माला मात्र खेळता येऊ शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. कारण रोहितला आता आणखी काही दिवस कोरोना टेस्टसाठी सामोरे जावे लागणार आहे.

इंडियन टीमच्या खेळाडुंचा अहवाल जरी कोरोना निगेटीव्ह आला असला तरी त्यांचे अद्याप कोरोना टेस्ट बाकी आहेत. रोहितला चौथ्या सामन्यात दुखापत झाली होती आणि त्यावेळी तो असिस्टंट फिजिओ योगेश परमार यांच्या संपर्कात आला होता.

योगेश परमान यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे रोहितला अजून काही कोरोनाच्या चाचण्यांना सामोरे जावे लागले. भारतीय खेळाडूंच्या अजून दोन कोरोना चाचण्या बाकी आहेत. या चाचण्यांच्या अहवालावर रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्व सामने खेळणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून रोहितला अधिक काळ विलगीकरणात ठेवावे लागू शकते. आयपीएलचा (IPL 2021) पहिला सामना हा 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये होणार आहे.

भारताच्या सर्व खेळाडूंना युएईमध्ये आयपीएलसाठी दाखल झाल्यावर काही काळ विलगीकरणात राहावे लागणार आहे. पंरतु, रोहितची युएईमध्ये गेल्यावर कोरोना टेस्ट झाली आणि त्याचा अहवाल जर पॉझिटीव्ह आला तर त्याला टीममध्ये घेण्यात येणाार नाही. यामुळे खेळायचं की नाही हे सर्व चाचणीवर अवलंबून आहे. त्यामुळे आता रोहित खेळणार का नाही याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात ढगफूटीचा कहर! आतापर्यंत देशात एक नंबर; वाचा तज्ञांचा इशारा 
ऐन सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! ‘ह्या’ तारखेपासून गॅस आणि PNG प्रचंड महागणार 
जर फक्त धोनीमुळेच जिंकत असतो तर भारताचा ३ वेळा सुपर ८ मध्ये पराभव झाला नसता; पहा आकडेवारी काय म्हणतेय 
त्या रात्री भारतीय खेळाडू रात्री ३ वाजेपर्यंत झोपू शकले नाही; भारतीय खेळाडूंना ट्रोल करणाऱ्यांना दिनेश कार्तिकचे उत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.