Share

भयंकर अपघात! इलेक्ट्रिक बसने दिली १७ वाहनांना जोरदार धडक, ६ जणांचा मृत्यू तर ११ जण जखमी

uttar-pradesh-bus-accident

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. काल रात्री कानपूरमध्ये एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने १७ वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ११ जण जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.(big accident electric bus crash on 17 cars in uttar pradesh)

हा भीषण अपघात कानपूर शहरातील टॅटमिल क्रॉसरोडजवळ झाला आहे. एक अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने क्रॉसरोडजवळ अनेक वाहनांना धडक दिली. यादरम्यान काही पादचाऱ्यांना देखील बसची धडक बसली. वाहनांना धडक देत असताना या बसची एका ट्रकला धडक बसली. ट्रकला धडक दिल्यानंतर बस थांबली.

त्यानंतर इलेक्ट्रिक बसचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी व्यक्तींना तेथील रहिवाशांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने वाहने हटवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनियंत्रित बसने कार आणि दुचाकींना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवण्यात आले. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इलेक्ट्रिक बसच्या चालकाचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या संपूर्ण घटनेत बस चालकाची चूक असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी कानपूरमधील या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. “कानपूरमधील अपघाताची अत्यंत दुःखद बातमी मिळाली. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी मी देवाकडे प्रार्थना करते”, असे ट्विट त्यांनी केले आहे.

भारतचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी ट्विट करत म्हटले आहे की, “कानपूरमधील बस दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने खूप दुःख झाले. या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी मी इच्छा व्यक्त करतो.”

महत्वाच्या बातम्या :-
लोकांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमक्या, इंस्टावर रील्स बनवणारी ‘ही’ स्वयघोषित लेडी डॉन कोण आहे?
वाईन दुकानात तर येऊ द्या, मी स्वतः दुकानं फोडतो, इम्तियाज जलीलांचे ठाकरेंना थेट चॅलेंज
आज काळजी फाटलं! नितीन गडकरींसमोर भावनांचा बांध फुटला; आमदार बाप ओक्साबोक्शी रडला

इतर

Join WhatsApp

Join Now